दिल्लीत १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराने केलेल्या हल्लाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू तरुणाने तरुणीवर चाकूने सपासप वार केले आहेत. यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात असून, प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील दिग्घी पंचायत अंतर्गत येणाऱ्या हरिबेला गावातील आहे. येथे लग्नाला नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर हल्ला केला आहे. चांदणी कुमार असं जखमी तरुणीचं आणि चंदन कुमार असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी चंदनला पोलिसांनी अटक केली आहे.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
द्रराजला पत्नी व दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी प्राजक्ताच्या वयाची आहे. तरीही त्याने प्राजक्ताला लग्न करण्याचे आमिष दाखवले.
गवंड्याच्या प्रेमात पडली दहावीची विद्यार्थिनी, पळून जाऊन लग्न केले
Wife killed her husband, woman kills husband with wood
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात वाद; पतीचा खून
Fraud with a young woman Mumbai, lure of marriage,
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

हेही वाचा : दिल्लीत चाकूचे वार करुन अल्पवयीन मुलीची हत्या, एसी मॅकेनिक कसा झाला खुनी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

गावातील लोकांनी सांगितलं की, गेल्या चार ते पाच वर्षापासून चांदणी आणि चंदनचं प्रेमप्रकरण चालू होतं. पण, कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यावर पंचायतीने दोघांचं प्रेमसंबंध तोडलं होतं. ६ महिन्यापूर्वी तरुणाने तरुणीबरोबरचा एक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल केला होता. याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

हेही वाचा : दिल्लीत चाललंय काय? ३५ वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

चांदणीने पोलिसांना म्हटलं की, लग्नाला नकार दिल्याने तरुणाने चाकूने हल्ला केला. पोलीस अधिकारी मनोज कुमार तिवारी म्हणाले की, “आरोपी चंदन पळून जाण्याच्या तयारीत होता. पण, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.”

Story img Loader