श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या आफताब पूनावालाची सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) गुरुवारी जवळजवळ आठ तास सुरु होती. दिल्लीमधील रोहीणी भागातील फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेट्रीमध्ये (एफएसएल) ही चाचणी पार पडली. या चाचणीमध्ये आफताबला कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्याने काय माहिती दिली याबद्दलचा तपशील समोर आला आहे. आफताबने ही हत्या कशी केली, त्याचं श्रद्धाबरोबरचं नातं कसं होतं, त्याने पुरावे कुठे लपवले आहेत, त्याचं बालपण कसं होतं, कुटुंबाबद्दलची माहितीवर आधारित प्रश्न या चाचणीदरम्यान विचारण्यात आले.

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

bhiwandi highway robber marathi news
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Aurangzeb seated on a golden throne
‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?

सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या लाय डिटेक्टर चाचणीला सुरुवात झाली. सुरुवातीला आफताबचा रक्तदाब तपासण्यात आला. यानंतर चाचणीदरम्यान त्याला त्याच्या बालपणासंदर्भातील, त्याच्या मित्रांबद्दल आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्ध वालकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या पुढल्या सत्रामध्ये आफताबला श्रद्धाच्या हत्येसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. यात त्या रात्री नेमकी अशी काय गोष्ट घडली की रागाच्याभरात श्रद्धाची हत्या केली, ही हत्या नक्की कधी केली, या हत्येसंदर्भातील पुरावे नेमकं कुठे लपवले आहेत, यासारख्या गोष्टींबद्दलची माहिती या चाचणीदरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला. आफताबला सर्व प्रश्न हिंदीमध्ये विचारण्यात आले तरी त्याने सर्व प्रश्नांची उत्तरं इंग्रजीतच दिली.

नक्की वाचा >> Shraddha Murder: ‘त्या’ तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांचीच होणार चौकशी? शाह म्हणाले, “तेव्हा तेथे आमचं सरकार नव्हतं, मात्र…”

आफताबला तो श्रद्धाला डेट करायला लागल्यापासूनचा घटनाक्रमही या चाचणीदरम्यान विचारण्यात आला. त्याचप्रमाणे त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावली यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. ‘इंडिया टुडे’ने एफएसएलमधील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार अधिकारी आणि तज्ज्ञ आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे नेमके कुठे फेकले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच श्रद्धाचा फोन त्याने कुठे फेकला हो या चाचणीतून जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. फोनच्या मदतीने पोलिसांना बराच तपास करता येईल आणि पुरावेही हाती लागतील असा अंदाज आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासादरम्यान आफताबने यंत्रणांना सहकार्य केलं. आफताबला एकूण ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित वेळी म्हणजेच बुधवारी ही चाचणी घेण्यात आली नाही कारण आफताबला ताप आणि सर्दीचा त्रास होत होता. चाचणीदरम्यान आफताबला त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणतं हत्यार वापरलं होतं याबद्दलही विचारण्यात आलं. या माध्यमातून पुढील तपासामध्ये मदत होणार असून कोणतं हत्यार वापरण्यात आलेलं हे समजलं तर त्या दिशेने तपास करता येईल असं एफएसएलच्या सुत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. आफताबची नार्को चाचणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आफताब मराठी असता तर तू…”; २०१४-१५ मधील ठाण्यातील भेटीचा किस्सा चर्चेत

मागच्या शनिवारी आफताबला अटक करण्यात आली. त्यानंतर आधी पाच दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली. ज्यामध्ये मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्यात आली. आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. त्याने दिलेल्या वर्णनानुसार ज्या तलावात हे अवयवाचे तुकडे फेकले होते, त्या तलावाचे रेखाचित्र काढण्यात आले आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आमच्या अर्जाच्या आधारे, आम्हाला आरोपीची आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यास मदत होईल. सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) करण्याची परवानगीही मिळाली होती. त्यानुसारच ही चाचणी करण्यात आली.