१५० देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी आहे मुकेश अंबानींची रिलायन्स

कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार ७४२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीच्या मार्केट कॅपनं १० लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला. गेल्या ३० वर्षांमध्ये कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स तेल आणि गॅस सेक्टरमधील दिग्गज कंपनी म्हणून पुढे आली आहे. त्यानंतर आता डिजिटल आणि रिटेल क्षेत्रातही कंपनी पुढे आली आहे. त्यांच्या कंपनीने इतका मोठा पल्ला गाठला आहे की ती आता १५० देशांच्या जीडीपीपेक्षागी मोठी झाली आहे.

कंपनीच्या वाटचालीवर गुंतवणुकदारांनी विश्वास ठेवला असून कंपनीला त्यांच्याकडून कायम समर्थनही मिळत असल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच जानेवारी १९९१ पासून कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार ७४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान कंपनीनं मोठी प्रगतीही केली आहे. एस अँड पी आणि मूडीजनं रेटिंग दिलेली ही खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित रिलायन्सनं १० हजार कोटी रूपयांचा नफा कमावला होता. २ जानेवारी १९९१ ते २९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये ६०० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे एल अँड टी, अशोक लेलँड, टाटा स्टील, सिअॅट यांसारख्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १५ ते २०५ टक्क्यांची वाढ झआली आहे.

२००९ मध्ये कंपनीला १५ हजार २७८ कोटी रूपयांचा नफा मिळाला होता. २०१९ मध्ये तो वाढून ३९ हजार ७३४ कोटी रूपये झाला आहे. ही वाढ वार्षिक १० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. कंपनीनं वाढीसाठी कर्जाचाही आधार घएतली आहे. आर्थिक वर्ष २००९ मध्ये कंपनीवर कंसॉलिडेटेड डेट ७२ हजार २५६ रूपयांचे होते. ३१ मार्च २०१९ पर्यंत ते वाढून २.८७ लाख कोटी रूपये इतके झाले आहे. कंपनीनं हे कर्ज करण्याचं आश्वासनही दिलं आहे. २०२१ पर्यंत कंपनी कर्जमुक्त होईल, असा दावाही करण्यात आला आहे. तसंच आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीतही ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reliance industries mukesh ambani company value is more than gdp of 150 contries jud

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या