अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रुथ सोशल मीडियावर त्यांनी ही घोषणा केली. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाठिंब्याने हा प्रकल्प उभा राहत असल्याचेही त्यांनी जाहीर केलं. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलेला असतानाच ही घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं सविस्तर विश्लेषण काय आपण जाणून घेऊ.

काय म्हणाले गिरीश कुबेर?

इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाला १३ दिवस झाले आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की रिलायन्सतर्फे टेक्सासमध्ये ३०० बिलियन डॉलर्सच्या आधारे रिफायनरी सुरु होणार आहे. टेक्सास का? तर टेक्सास हे ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत त्यांचं प्राबल्य असलेलं राज्य आहे. टेक्सासमध्ये तेल कंपन्यांच्या सहभागाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे ही घोषणा करण्यात आली आहे. तेल शुद्धिकरण प्रकल्प काढण्यात येईल ही घोषणा ट्रम्प यांनी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा का केली? याचं उत्तर असं आहे की रिलायन्स ही सुचीबद्ध कंपनी आहे. अशी कंपनी गुंतवणूक करते तेव्हा सेबीला कल्पना दिली जाते. सेबीला कल्पना दिली गेली होती का? कारण सेबीला नवा भागिदार कोण कुठे गुंतवणूक हे सांगितलं जातं. सेबीकडून अशी काही माहिती मिळालेली नाही. रिलायन्सकडून ही घोषणा का झाली नाही हा प्रश्नही आहेच. रिलायन्सने अजूनही काहीही उत्तर दिलेलं नाही, तपशील दिलेला नाही. एवढी मोठी गुंतवणूक होती तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रम्प यांनी माहिती का दिली नाही? हे चार मुद्दे आहेत. त्यातल्या तांत्रिक बाबींकडे जायला हवं. रिलायन्स का? तर रिलायन्सने जामनगरसारख्या नाकारलेल्या ठिकाणी धीरुभाई अंबानी यांनी जगातली प्रचंड क्षमतेची रिफायनरी म्हणजेच तेल शुद्धिकरण प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय? तर तेलाच्या क्षेत्रात बॉर्डर ऑफ बॅरल असा शब्द वापरला जातो. तळाचं तेल असं म्हटलं जातं. तेलाचा वरचा जो स्तर असतो तो उच्च स्तरीय आहे. सौदीत मिळणाऱ्या तेलाचा दर्जा खूप चांगला असतो. सौदी अरेबियातल्या तेलाला मागणी जास्त असते कारण अशुद्ध घटक फारसे नसतात आणि असतात ते वेगळे करायला फारशी मेहनत किंवा कष्ट लागत नाहीत. असं करत करत तेलाचा एक दर्जा असाही असतो जो अत्यंत गचाळ असतो. जगातलं सर्वात घाण दर्जाचं तेल त्याला बॉटम ऑफ द बॅरल असा शब्द त्याला वापरला जातो. रिलायन्सच्या या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की जगातलं कितीही घाण दर्जाचं तेल असू दे त्याचं रुपांतर वापरण्यायोग्य तेलामध्ये करता येतं. अशा तेलाला जगातून मागणी असते. असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

जगातलं कितीही भिकार दर्जाचं तेल असेल तरीही रिलायन्सच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पात ते वापरण्यायोग्य केलं जातं. जुगाड हा शब्द अलिकडे अनेकदा वापरला जातो तो शब्द धीरुभाईंनी दिला आहे. टेक्सासमधली रिफायनरी ही अशा दर्जाची असणार आहे. शेल ऑईल असं त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे रिलायन्सशी भागिदारी असा त्याचा अर्थ आहे.