कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (22) आणि येनाकापा तलवाड (60), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Black Magic Comment: असलं काही बोलून पंतप्रधानपदाची पातळी घसरवू नका, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

प्राथमिक माहितीनुसार, एका हिंदू मुलाचे मुस्लीम मुलीवर प्रेम होते. मोहरमच्या एका कार्यक्रमादरम्यान मुलगा मुलीला भेटायला गेला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. याची माहिती दोघांच्या घरच्यांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने यावेळी हाणामारीही झाली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – उपराष्ट्रपती न केल्याने युती तोडली? मोदींच्या दाव्यावर नितीशकुमार म्हणाले “बोगस…”

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious violence due to love affair in karnataka two death spb
First published on: 11-08-2022 at 15:17 IST