scorecardresearch

Premium

MS Swaminathan Passes Away: ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

MS Swaminathan Died at 98: एम. एस. स्वामीनाथन यांचं ९८व्या वर्षी निधन झालं आहे. भारतीय शेती क्षेत्राच्या विकासामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं.

Father of India’s Green Revolution MS Swaminathan Died at 98
हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचं निधन (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

Father of India’s Green Revolution MS Swaminathan Passes Away: १९६० च्या दशकात भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं.

स्वामीनाथन यांची कारकिर्द

एम. एस. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिलं. १९७२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते. पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० ते ८२ या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. १९८२ ते ८८ या ७ वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केलं.

Caste-Census-Bihar
Bihar caste survey: बिहारच्या राजकारणातील ईबीसी गटाचे महत्त्व
Union Minister Raj Kapil Patil criticized contractors poor work development projects
ठाणे जिल्ह्यात निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचा वरचष्मा; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका
MS Swaminathan
एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषीसंशोधन क्षेत्रातील योगदान काय? वाचा सविस्तर…
raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा

शेतकरी आत्महत्या व राष्ट्रीय शेतकरी आयोग

२००४ साली वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदी स्वामीनाथन यांची नियुक्त करण्यात आली. स्वामीनाथन आयोगानं २००६ साली त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती.

करुणामयी विज्ञानाचार्य…एम. एस. स्वामीनाथन!

पहिला जागतिक अन्न पुरस्कार!

एम. एस. स्वामीनाथन यांचा १९८७ साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने (World Food Prize) सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली.

एम. एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय एच. के. फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१) व अल्बर्ट आईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड (१९८६) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Renowned agri scientist father of green revolution ms swaminathan passed away pmw

First published on: 28-09-2023 at 12:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×