मंगळूरु विद्यापीठातून हिजाबधारी विद्यार्थिनींची परतपाठवणी

मंगळूरु विद्यापीठाने शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी गणवेश घालण्याची तसेच वर्गात हिजाब घालण्यास मनाई असल्याची सूचना जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी विद्यार्थिनींचा एक गट हिजाब घालून विद्यापीठ संकुलात आला.

एक्स्प्रेस वृत्त, बंगळूरु : मंगळूरु विद्यापीठाने शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी गणवेश घालण्याची तसेच वर्गात हिजाब घालण्यास मनाई असल्याची सूचना जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी विद्यार्थिनींचा एक गट हिजाब घालून विद्यापीठ संकुलात आला. या विद्यार्थिनींना परत पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी चित्रित केलेल्या एका ध्वनिचित्रफितीत महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुसया राय या हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गणवेशाच्या नियमांबाबत समजावून सांगत असल्याचे दिसत आहेत.

महाविद्यालय विकास परिषदेने (सीडीसी) आयोजित केलेल्या कुलगुरू, प्राचार्य आणि विद्यापीठ सिंडिकेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की, कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च रोजी हिजाबबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी. त्यानुसार वर्गात हिजाबचा पेहेराव करण्यास मनाई केली जावी.  त्यानुसार शनिवारी विद्यापीठाने हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना माघारी पाठविले. कुलगुरू सुब्रमण्या यदापदीथया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थिनींना हिजाब घालायचा आहे, त्यांची नावे हिजाबला मनाई नसलेल्या महाविद्यालयांत नोंदविली जातील.

हा प्रश्न सिंडिकेटच्या बैठकीत विचारविनिमयातून सोडविण्यात आला आहे. सर्वानी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी वादापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

-बसवराज बोम्मई, कर्नाटकचे मुख्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Repatriation hijab wearing students mangalore university students uniform ysh

Next Story
तीन विवाहित बहिणी, दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू
फोटो गॅलरी