अफगाणिस्तान : गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन करतो म्हणून तालिबानकडून पत्रकाराला बेदम मारहाण

तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. हजी याकूब परिसरामध्ये ही सर्व घटना घडली.  

Reporter From TOLO News
या ग्रुपनेच घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिलीय. (फोटो टोलो न्यूज ट्विटर आणि एपीवरुन साभार)

अफगाणिस्तानमधील पहिली स्वतंत्र वृत्तवाहिनी असणाऱ्या टोलो न्यूजच्या पत्रकाराची तालिबानने हत्या केल्याची बातमी कंपनीने दिली. मात्र थोड्याच वेळात या पत्रकाराने ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं असून आपले प्राण वाचल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्वात आधी या मारहाणीसंदर्भात टोलो ग्रुपने माहिती दिली आणि त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर या पत्रकाराचे ट्विट समोर आले आणि तो जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. या पत्रकाराला देशाची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये मारहाण झाली.

झिअर याद खान असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. खान आणि एका कॅमेरामन काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. हजी याकूब परिसरामध्ये ही घटना घडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reporter from afghanistan tolo news killed by taliban media group scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या