प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देशाच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींची भूमिका महत्त्वाची आहे. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबर देशाच्या कल्याणासाठी एकजुटीनं पुढे जायला हवं, असं राष्ट्रपती म्हणाले.

Live Blog

20:29 (IST)25 Jan 2020
युवकांनी गाधीजींचा अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवावा

कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी विशेषतः तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे. जो मानवी मूल्यांसाठी सर्वात मोठी भेट आहे.

20:19 (IST)25 Jan 2020
महात्मा गांधींचे विचार आजही प्रासंगिक

राष्ट्रविकासात महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता कायम आहे. सत्य आणि अहिंसा हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश आजच्या परिस्थिती गरजेचा झाला आहे.

20:17 (IST)25 Jan 2020
एकजुटीनं पुढे जायला हवं

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देशाच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींची भूमिका महत्त्वाची आहे. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबर देशाच्या कल्याणासाठी एकजुटीनं पुढे जायला हवं, असं राष्ट्रपती म्हणाले.

19:15 (IST)25 Jan 2020
देशाच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय

देशाच्या विकासासाठी सक्षम अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने देशातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पाऊले टाकली आहेत.

19:11 (IST)25 Jan 2020
सरकार देशाच्या प्रत्येक भागाचा संपूर्ण विकास करणार

जम्मू काश्मीर, लडाख असो की ईशान्येकडील राज्य असो. देशाच्या प्रत्येक भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करीत आहे.

19:07 (IST)25 Jan 2020
"लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे"

संविधानाने आपल्याला लोकशाही अधिकार दिले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे.

18:28 (IST)25 Jan 2020
राष्ट्रपती काय बोलणार?

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात राष्ट्रपती देशसमोरील प्रश्नांचा आणि आव्हानांवर भाष्य करतात. सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध होत आहे. तर समर्थनही दिलं जात आहे. या कायद्यावरून विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचं केंद्र सरकारनं अगोदरच म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रपती देशात चर्चेत असलेल्या या कायद्यावर नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.