पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,सात ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदकं मिळाली आहेत.

AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

देशातील ८८ पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे….

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)
१) विनय महादेवराव कोरगावकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट मुंबई

२) प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट सहा, धुळे

३) चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे
४) अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड

राज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’
१) गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२) महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
३) संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार
४) भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक
५) दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार
६) निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार
७) संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.

राज्यातील एकूण ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झालं असून त्यांची नावं पुढील प्रमाणे…
१) राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई

२) चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीपी मीरा भाईंदर, वसई विरार
३) सीताराम लक्ष्मण जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे
४) भारत केशवराव हुंबे, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी
५) गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
६) अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलीस निरीक्षक, सीपी नवी मुंबई
७) जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलीस निरीक्षक सी.पी. मुंबई
८) विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलीस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर
९) जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई
१०) सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर
११) प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट चार, नागपूर
१२) मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक,मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई
१३) शशिकांत दादू जगदाळे, पोलीस निरीक्षक सीपी, मुंबई शहर
१४) रघुनाथ रामचंद्र निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर
१५) संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर
१६) राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर
१७) प्रकाश भिला चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
१८) नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर
१९) राजेश रावणराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी परभणी
२०) शिवाजी विठ्ठल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर
२१) राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी जळगाव
२२) देवेंद्र परशराम बागी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
२३) संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा
२४) बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी. कोल्हापूर<br>२५) पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
२६) विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
२७) पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई
२८) राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर
२९) अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा
३०) संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,
३१) रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ
३२) अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर
३३) सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर
३४) बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली
३५) काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे
३६) अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर
३७) आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली
३८) मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
३९) सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर
४०) लहू मनोहर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर