इस्रायलच्या भारताला अनोख्या शुभेच्छा; ऐतिहासिक वास्तूंसमवेत भारतीय भाषांमध्ये मान्यवरांचा संवाद! | Republic Day Parade: President Droupadi Murmu to lead the nation in celebrating 74th R-Day | Loksatta

Republic Day 2023: इस्रायलच्या भारताला अनोख्या शुभेच्छा; ऐतिहासिक वास्तूंसमवेत भारतीय भाषांमध्ये मान्यवरांचा संवाद!

Republic Day 2023: देशभरात आज ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

republic day 2023 (2)
इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या भारताला अनोख्या शुभेच्छा!

74th Republic Day 2023 Parade: आज देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

YouTube Poster

दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.

Live Updates

Republic Day 2023 Live Updates in Marathi : देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह!

12:42 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: इस्रायलच्या भारताला अनोख्या शुभेच्छा!

इस्रायलच्या भारताला अनोख्या शुभेच्छा; ऐतिहासिक वास्तूंसमवेत भारतीय भाषांमध्ये मान्यवरांचा संवाद!

11:48 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: अमेरिकन दूतावासानं शेअर केला वंदे मातरम गाण्याचा व्हिडीओ!

अमेरिकन दूतावासाकडून अनोख्या पद्धतीने गायलेल्या वंदे मातरम् गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकन अधिकारी राघवन आणि स्टेफनी यांनी पवित्रा चारी यांच्यासमवेत हे गाणं तयार केलं आहे. २०२३च्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या अल्बममधील हे गाणं आहे.

11:44 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठांचं सादरीकरण!

महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठांचं सादरीकरण!

11:25 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: वाघा बॉर्डरवर भारतीय जवानांनी केलं ध्वजावतरण

पंजाबमधल्या ऐतिहासिक अटारी सीमेवर भारतीय जवानांनी ध्वजावतरण केलं.

11:23 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: तामिळनाडूमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजावतरण संपन्न!

तामिळनाडूमध्ये राज्यपाल आर. एन. रवी यांच्याहस्ते ध्वजावतरण संपन्न झालं.

11:15 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: मोदींची वॉर मेमोरियलवर शहीदांना श्रद्धांजली!

कर्तव्यपथावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

11:13 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: कर्तव्य पथावर NCC च्या कॅडेट्सचं पथसंचलन

कर्तव्यपथावर एनसीसीच्या कॅडेट्सचं सादरीकरण…

10:52 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकमध्ये तिरंगा फडकला!

काश्मीरच्या श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकमध्ये क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवण्यात आला आहे.

10:51 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलनाला सुरुवात….

दिल्लीत कर्तव्य पथावर पथसंचलनाला सुरुवात झाली असून सैन्यदलाच्या विविध तुकड्या आपापलं कसब दाखवत आहेत.

10:32 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: राष्ट्रपती, पंतप्रधान आणि प्रमुख पाहुण्यांचं कर्तव्य पथावर आगमन…

दिल्लीत पथसंचलनासाठी कर्तव्यपथ सज्ज झाला आहे. नुकतंच कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देह फते अल सीसी दाखल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते यावेळी ध्वजावतरण करण्यात आलं.

10:05 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण…

आपण याची काळजी घेतली पाहिजे की विविधतेने नटलेल्या आपल्या समाजात बंधुभाव असतो, तेव्हा स्वातंत्र्यासोबतच समानतेची खात्री निर्माण होते. मोठ्या कष्टाने मिळालेल्या या स्वातंत्र्याच्या संरक्षणाचीही खात्री निर्माण होते. हे काम इतर कुणी करणार नसून आपल्यालाच ते करावं लागणार आहे – सरसंघचालक मोहन भागवत

10:04 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण…

स्वातंत्र्य आणि समतेसोबतच विविधता हा शब्द आपल्या संविधानात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या बंधुभावाला देशभरात आपल्याला प्रचलित करावं लागेल. वेगवेगळ्या विचारसरणींना मानणारे आपण लोक संसदेत आपले वेगवेगळे गट बनवून आपण बसलो आहोत. लोकशाही प्रक्रियेत यातूनच संवाद बनतो. – सरसंघचालक मोहन भागवत

10:00 (IST) 26 Jan 2023
republic Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण हा प्रजासत्ताक दिन आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा करत आहोत. देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्नं साकार करण्यासाठी आपण एकत्रितपणे वाटचाल करुयात हीच माझी इच्छा आहे”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

09:44 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023 Updates : “भविष्यासाठी मोठी ध्येयं आणि संकल्प अतिशय आवश्यक, मात्र…” पंतप्रधान मोदींचं विधान!

74th Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत NCC-NSS कॅडेट्स यांच्यासह प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील तरूण कलावंताना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी मोदी म्हणाले, “मित्रांनो भविष्यासाठी मोठी ध्येय आणि संकल्प हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. मात्र याचबरोबर आपल्याला वर्तमानातील छोट्या-मोठ्या प्राथमिकतानांही तेवढच महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे माझा तुम्हा सर्वांना आग्रह असेल, की देशात होणाऱ्या बदलांची तुम्हाला माहिती असू द्या.” वाचा सविस्तर बातमी…

09:43 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023 : “…तर हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावंच लागेल”, शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

74th Republic Day 2023 Parade : आज आपला भारत देश ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त गावखेड्यापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीत पथसंचलन होणार आणि पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शिवसेनेने (ठाकरे गट) मोदी सरकारला उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

09:39 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजावतरण!

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ध्वजावतरण करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहा व्हिडीओ

09:24 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: शिवाजी पार्कवर राज्यपालांचं भाषण सुरू…

७३व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या जनतेला शुभेच्छा देतो – राज्यपाल

09:24 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: शिवाजी पार्कवर राज्यपालांचं भाषण सुरू…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतंच मेट्रो मार्ग २ आणि मेट्रो मार्ग ७ यांचा दुसरा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

09:17 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजावतरण संपन्न!

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते ध्वजावतरण पार पडलं. यानंतर शिवाजी पार्कवर राज्यातील विविध विभागांचे चित्ररथ शिवाजी पार्कवरील संचलनामध्ये सादर होणार आहेत. पाहा व्हिडीओ

09:04 (IST) 26 Jan 2023
Republic Day 2023: अमोल मिटकरींनी राहत्या घरी केले ध्वजारोहण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्या राहत्या घरी ध्वजावतरण करून झेंडावंदन केलं.

08:51 (IST) 26 Jan 2023
Republic Day: RSS मुख्यालयात झेंडावंदन संपन्न!

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न!

08:46 (IST) 26 Jan 2023
Republic Day: महाराष्ट्राच्या जनतेला मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न. 'वर्षा'वर माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा.

पाहा व्हिडिओ

08:43 (IST) 26 Jan 2023
Republic Day: धनंजय मुंडेंनी लेकीसोबतचा व्हिडीओ केला ट्वीट!

हा व्हिडीओ धनंजय मुंडे यांच्या बीडमधील निवासस्थानातला आहे. व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे पलंगावर झोपले असून त्यांच्या बाजूला त्यांची मुलगी आदिश्री उभी आहे. हातात भारताच्या राष्ट्रध्वजाचा एक फोटो घेऊन धनंजय मुंडे मुलीला प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. वाचा सविस्तर

08:19 (IST) 26 Jan 2023
Republic Day: जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांची तिरंगा रॅली!

जम्मू-काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी काढली तिरंगा रॅली!

07:57 (IST) 26 Jan 2023
Republic Day: Whatsapp वर प्रजासत्ताक दिनाचे स्टिकर्स डाउनलोड कसे करायचे?

२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाट्सअपवरून प्रजासत्ताक दिनाचे स्टिकर्स डाउनलोड कसे करायचे? वाचा सविस्तर

07:55 (IST) 26 Jan 2023
Republic Day: हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा कायम ऋणी राहील – राष्ट्रपती

घटना समिती अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत हा देश त्यांचा कायमच ऋणी राहील. आजच्या दिवशी विधिज्ञ बी. एन. राऊ यांचेही राज्यघटनेतील योगदानासाठी स्मरण केले पाहिजे. या घटनेमध्ये देण्यात आलेली दृष्टी ही आपल्या प्रजासत्ताकाची मार्गदर्शक आहे. या काळात एकेकाळी गरीब आणि अशिक्षितांचा देश असलेला भारत आता जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने पाऊले टाकत आहे. राज्यघटनेतील सामुदायिक शहाणपणाखेरीज हे शक्य झाले नसते – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

07:54 (IST) 26 Jan 2023
Republic Day: धनंजय मुंडेंचा प्रजासत्ताक दिनाबद्दल लेकीशी संवाद!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुलगी आदिश्रीसमवेत प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या संवादाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

07:30 (IST) 26 Jan 2023
‘कर्तव्य पथा’वर होणार संरक्षण दलातील स्त्री सामर्थ्याचं दर्शन!

74th Republic Day of India देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भारती संरक्षण दलांच्या दमदार संचलनामध्ये अनेक तुकड्यांचे नेतृत्त्व महिला अधिकाऱ्यांच्याहाती असणार आहे… वाचा सविस्तर

07:29 (IST) 26 Jan 2023
महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांनी शौर्य पदक मिळवले!

प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झालं आहे. वाचा सविस्तर

07:28 (IST) 26 Jan 2023
प्राजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, ३ हजार पोलीस बंदोबस्तात

प्रजास्ताक दिनानिमित्त गुप्तचर विभागाने राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामुळे नागपूर पोलीस ‘अलर्ट मोड’वर आहेत.

वाचा सविस्तर

07:28 (IST) 26 Jan 2023
अग्रलेख : प्रजासत्ताकातील प्रजा

सुमारे १२ वर्षांपूर्वी मोजल्या गेलेल्या गरिबांच्या आकडेवारीचा आधार सरकारी योजनांसाठी आजही घेतला जातो.

वाचा आजचा अग्रलेख

07:24 (IST) 26 Jan 2023
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना राष्ट्रपतींचा संदेश…

आपल्या राज्यघटनेची पायाभरणी करणाऱ्यांनी आपल्या मार्ग दाखवून आणि नैतिकतेची चौकट आखून देत मार्गावरून चालत राहणे ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली आहे. घटनाकारांनी दाखविलेली दूरदृष्टी ही आपल्या प्रजासत्ताकाची मार्गदर्शक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांचा परामर्श घेतला. वाचा सविस्तर

07:23 (IST) 26 Jan 2023
झाकीर हुसेन, सुधा मूर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा; पाहा यादी

Padma Awards 2023 : भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

07:20 (IST) 26 Jan 2023
74th Republic Day: दिल्लीच्या राजपथावर अवतरणार महाराष्ट्राचा चित्ररथ!

आज दिल्लीच्या राजपथावर ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ अवतरणार असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश आहे.

07:19 (IST) 26 Jan 2023
७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर सोहळ्याची तयारी!

देशभरात आज ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत असून या सोहळ्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर जय्यत तयारी झाली आहे. सकाळी ९ च्या सुमारास शिवाजी पार्कवरील सोहळ्याला सुरुवात होईल.

७४व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह! (फोटो – पीटीआय)

India 74th Republic Day Live Update : देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह!

First published on: 26-01-2023 at 07:17 IST
Next Story
गोध्रा दंगलीतील हत्येप्रकरणी २२ जणांची मुक्तता ; गुजरातमधील सत्र न्यायालयाचा निर्णय