scorecardresearch

Premium

भाजी विक्रेते, रिक्षाचालक ते.. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ‘या’ VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान

Republic Day 2023 Parade Celebration: २६ जानेवारी २०२३ ची परेड खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं प्रतीक ठरावी यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

Republic Day 2023 Parade VVIP Guests Vegetable Vendor Rickshaw Puller Central Vista Worker Who will Be on Stage
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला 'या' VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Republic Day 2023 Parade Celebration: २६ जानेवारी २०२३ ची परेड खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं प्रतीक ठरावी यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. हे VVIP म्हणजेच आपल्या देशातील श्रमजीवी असणार आहेत. भाजी विक्रेते, रिक्षा चालक तसेच ज्या कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा तयार करण्याचे काम केले अशा मंडळींची कुटुंब, कर्तव्य पथचे देखभाल करणारे कामगार यांना यंदा मुख्य व्यासपीठावर मानाचं व हक्काचं स्थान मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाचं प्रजासत्ताक दिनाचं उत्सवाची थीम ‘सामान्यांचा सहभाग’ अशी असणार आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनानंतरचा पहिला मोठा राष्ट्रीय उत्सव असणार आहे.

प्रजासत्ताक दिन परेडसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग

मीडिया रिपोर्टनुसार, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यावर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. इजिप्तमधील १२० सदस्यीय मार्चिंग तुकडी देखील परेडमध्ये सहभागी होणार आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये सुधारित सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या उद्घाटनावेळी पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले होते. यानंतर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर ही प्रजासत्ताक दिनाची परेड आहे. परेडसाठी तब्बल ४५,००० जागा उपलब्ध असणार आहेत ज्यातील ३२,००० जागा व एकूण क्षमतेच्या १० टक्के जागा हा ऑनलाईन बुकिंग साठी उपलब्ध असतील.

Odisha BJP
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!
rajyasabha in uttar pradesh
उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या दहा जागांसाठी चुरस, ११ उमेदवार रिंगणात; कोण मारणार बाजी?
rajyasabha
Rajya Sabha Election: राज्यसभेत २८ पैकी २४ नव्या चेहर्‍यांना संधी; लोकसभेसाठी भाजपाची मोठी रणनीती
aashayein 65th rotary district 3170 conference
देशाच्या बळकटीसाठी संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे

विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

सामन्यातील असामान्य

गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सरकारी समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व जास्तीत जास्त करण्यावर विशेष भर दिला आहे. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही, ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि आघाडीवर असलेल्या कामगारांना राष्ट्रीय भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.

पुरस्कारांच्या यादीत सामान्य लोकांनी पद्म पुरस्कार समितीला सुचविलेल्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या विजेत्यांमध्ये लोककलाकार, सामाजिक कार्यकर्ते, संगीतकार, खेळाडू, समाजसेवेतील लोक आणि इतरांचा समावेश होता.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर भारत पर्व साजरे होईल. यात आदिवासी व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयांचे कार्यक्रम आणि विविध राज्यांच्या कला प्रकारांचे आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन देखील केले जाईल. फ्लायपास्टमध्ये १८ हेलिकॉप्टर, ८ ट्रान्सपोर्टर एअरक्राफ्ट आणि २३ लढाऊ विमाने असतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Republic day 2023 parade vvip guests vegetable vendor rickshaw puller central vista worker who will be on stage svs

First published on: 21-01-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×