राजपथावर ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपतींचे अंगरक्षक (पीबीजी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात घेऊन गेले. पीबीजी मधला खास घोडा असणाऱ्या विराटच्या उपस्थितीने हा सोहळा खास बनला. १५ जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी स्टाफचे चीफ कमंडेशन देण्यात आले. असाधारण सेवेसाठी आणि क्षमतेबद्दल प्रशंसा मिळवणारा विराट हा पहिला घोडा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटने १३ वेळा या स्पर्धेत यशस्वी सहभाग घेतला आहे.

विराटला गेल्या १३ वर्षांपासून भारताच्या माजी राष्ट्रपतींना तसेच विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान आहे. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या ताफ्यातील खास घोडा ‘विराट’ला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विशेष सन्मान दिला आहे. विराटला त्याच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्ड देण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यातील विराट हा पहिला घोडा आहे ज्याला हे सन्मानपत्र मिळाले आहे.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

विराटला त्याच्या निस्वार्थी आणि अतुलनीय सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. विराटला गेल्या १३ वर्षांपासून भारताच्या माजी राष्ट्रपतींना तसेच विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान आहे. परेड दरम्यान विराट हा सर्वात विश्वासू घोडा मानला जातो. हा सामान्य घोडा नसून देशाच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक परिवारातील एक मोठा घोडा आहे, ज्याला राष्ट्रपतींचे अंगरक्षक चार्जर देखील म्हणतात.

विराट २००३ मध्ये हेमपूरच्या रिमाउंट ट्रेनिंग स्कूलमधून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात सामील झाला होता. होनोव्हेरियन जातीचा हा घोडा, त्याच्या नावाप्रमाणेच, अतिशय मोठा, शिस्तप्रिय आणि आकर्षक उंचीचा आहे. २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेड आणि बीटिंग द रिट्रीट समारंभात वृद्ध असतानाही घोड्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती, असे विराटबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले.

सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना औपचारिक परेडमध्ये सन्मानाने एस्कॉर्ट करण्याचा विराटला गौरव आहे.