एससीओ शिखर बैठकीत धोरणासाठी आवाहन

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने मूलतत्त्ववाद तसेच दहशतवादाच्या विरोधात धोरण ठरवावे व या दोन्ही आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संस्थेच्या शिखर बैठकीत आभासी पद्धतीने केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, या भागातील प्रश्नांचे मूळ कारण मूलतत्त्ववाद व दहशतवाद हे आहे, अफगाणिस्तानातील घडामोडीतून हेच अधोरेखित झाले आहे. शांतता, सुरक्षा, विश्वास यांचा अभाव हीच या भागातील मोठी आव्हाने आहेत. याचे मूळ कारण वाढता मूलतत्त्ववाद हे आहे. अफगाणिस्तानात याचे प्रत्यंतर आले असून शांघाय कोऑपरेशन कार्पोरेशन या संस्थेने याबाबत एक धोरण चौकट तयार करावी, त्यासाठी इस्लामशी संबंधित परंपरा, सर्वसमावेशक संस्था, सहिष्णुता, नेमस्तपणा या तत्त्वांचा आधार घेण्याची गरज आहे. मूलतत्त्ववादाविरोधातील लढाई ही प्रादेशिक सुरक्षिततेसाठीच नव्हे तर विश्वासासाठीही उपयुक्त आहे. त्यांनी इराणचे नवीन सदस्य म्हणून स्वागत केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Response to fundamentalist problems in afghanistan prime minister narendra modi akp
First published on: 18-09-2021 at 00:01 IST