भाजपाचेच तीन मुख्यमंत्री मोदी-शहांना मानत नाहीत! सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याचे वक्तव्य

मोदी सरकारवर टीका करत सेवानिवृत्त IAS अधिकारी म्हणाले की, “आता यूपीमध्ये ‘खेला होबे’ नक्की.”

Retired IAS Officer Says BJP Three Chief Ministers Do Not Believe in Modi-Shah gst 97
"भाजपचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शहा यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत?" (Photo : PTI)

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रतापसिंह हे सोशल मीडियावर आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यातच आता त्यांनी थेट भाजपावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत भाष्य केलं आहे. मोदी सरकारवर टीका करत सूर्यप्रताप सिंह म्हणाले की, “आता यूपीमध्ये ‘खेला होबे’ नक्की.” सूर्य प्रतापसिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “भाजपचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शहा यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत? टोकाच्या या लढाईत ही सर्वशक्तिमान जोडीची ताकद कमी होते आहे का? वरवर दिसणाऱ्या शांततेदरम्यान येणारे काही आवाज हे नक्कीच काहीतरी संकेत देत आहेत. आता काहीही झालं तरी, आता उत्तर प्रदेशातही खेला होबे नक्की.”

काँग्रेसचे आमदार मुकेश शर्मा यांनी देखील भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपाचा खेळ अयशस्वी ठरला आहे. “मुख्यमंत्री बदलणं हा प्रयोग नसून अपयश लपवण्याचा खेळ आहे.” दरम्यान, सूर्यप्रताप सिंह यांची पोस्ट पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

…आता २०२४ मध्ये मोदी देखील जातील!

शमी शेख नावाच्या युझरने सांगितलं की, “सत्य हे देखील आहे की यूपीचे लोक योगींच्या कार्यावर खूप आनंदी आहेत.” तर सचिन युवराज नावाच्या युझरने यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, “तिरथसिंह गेले, येडियुरप्पा गेले, रुपाणी गेले, २०२२ मध्ये योगी जातील आणि २०२४ मध्ये मोदी देखील जातील.” याचसोबत, यावर आणखीही काही प्रतिक्रिया आल्या आहेत.

जेव्हा मोदी-योगी जातील, तेव्हाच…!

मिलिंद शाह नावाच्या युझरने म्हटलं की, भाजपा आणि संघातील प्रत्येकजण मोदी-शहा यांची स्तुती करत आहे आणि जे लोक विरोध करत आहेत त्यांना हळूहळू दूर केलं जात आहे. तर राजा सिंह नावाच्या एका युझरने म्हटलं आहे की, “जेव्हा मोदी योगी जातील, तेव्हाच चांगले दिवस येतील. जर मोदी योगी तिथेच राहिले तर मोठा शोक आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Retired ias officer says bjp three chief ministers do not believe in modi shah gst

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी