गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही वरीष्ठ पदावर बसलेल्या नेतेमंडळींकडून इतिहासातील महान व्यक्तिमत्वांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. या विधानांवरून मोठा वादही निर्माण झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे आपल्या विधानाला त्यांनी थेट वाल्मिकी रामायणातला संदर्भ दिल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले भगवान?

निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखक के. एस. भगवान यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान यासंदर्भात विधान केलं आहे. “सध्या लोक चर्चा करतायत की रामराज्य निर्माण व्हावं. पण जर तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचलं तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी ११ हजार वर्षं राज्य केलं नव्हतं. त्यांनी फक्त ११ वर्षं राज्य केलं होतं”, असा दावा भगवान यांनी केला आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

“भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवलं. तिच्याबद्दल कोणताही विचार त्यांनी केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या सूद्र व्यक्तीचं मुंडकं धडावेगळं केलं होतं. त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतील?” असा सवालही भगवान यांनी उपस्थित केला आहे.

२०१९मध्येही केलं होतं विधान

दरम्यान, भगवान यांनी चार वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचं केलेलं विधान चर्चेत आलं होतं. त्यावेळीही त्यांनी वाल्मिकी रामायणमधील उत्तरतकांड भागाचा संदर्भ दिला होता. मात्र, वाल्मिकी रामायणाचा उत्तरकांड हा शेवटचा भाग वाल्मिकींनी लिहिलाच नव्हता, तो नंतर त्यात समाविष्ट करण्यात आला, असा दावा त्यावर केला जातो.