Premium

ठरलं! ‘हा’ नेता होणार तेलंगणाचा नवा मुख्यमंत्री, सात डिसेंबरला शपथविधी, काँग्रेसची घोषणा

हैदराबादमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार स्थापनेबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Revanth Reddy
काँग्रेसने तेलंगणा विधानसभेच्या ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या आहेत. (PC : PTI)

देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या पाचपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांची निवडणूक भाजपाने जिंकली आहे. तर तेलंगणा हे राज्य काँग्रेसने बीआरएसकडून हिसकावलं आहे. यासह मिझोरम विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. झोरम पिपल्स मूव्हमेंटने मिझोरममध्ये सत्ता मिळवली आहे. पाचपैकी एकमेव तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होणार हे देखील ठरलं आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सात डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेस पक्ष कार्यालयाने रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज केवळ त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तिथे सर्वानुमते रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Revanth reddy to be new telangana chief minister swearing in on 7th december asc

First published on: 05-12-2023 at 20:21 IST
Next Story
भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार?