२०१४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर दुसऱ्यांदा २०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्रात सत्तेत आले. आता मोदी सरकारला देशात सत्ता स्थापन करून ८ वर्ष झाली आहेत. या काळात केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यापैकी काही निर्णयांनंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली, तर काही निर्णयांचं स्वागत झालं. गेल्या आठ वर्षात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांबद्दल आपण जाणून घेऊयात…

नोटबंदी, कृषी कायदे, कलम ३७०, GST, राफेल, नवीन शिक्षण धोरण, पीएम किसान सम्मान निधी योजना, उज्वला योजना असे अनेक महत्वाचे निर्णय आणि योजना या मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत घेतले आहेत.