देशातील करोना संसर्गाची परिस्थिती पाहता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रौढ करोनाबाधित रूग्णांच्या व्यवस्थापनासाठी सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वात तीन प्रकारच्या रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे, रुग्णांची सौम्य, मध्यम आणि गंभीर श्रेणी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच, अशा रुग्णांना सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याचा, हाताच्या स्वच्छतेचे पालन करण्याचा आणि घरामध्ये मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौम्य लक्षणे –

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास किंवा खूप ताप किंवा फार खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त असेल तरच वैद्यकीय मदत घ्यावी. अशा रुग्णांना घरीच विलगीकरण पाळावे. याशिवाय सॅनिटायझर वापरण्याचा आणि हात वारंवार धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मध्यम कोविड रुग्ण –

९० ते ९३ टक्के दरम्यान डिस्पनिया किंवा SP02 पातळी यांसारखी मध्यम करोना लक्षणे असलेल्या लोकाना कोविडच्या उपचारासाठी क्लिनिकल वॉर्डमध्ये दाखल केले जाऊ शकते. अशा रूग्णांना सुधारित शिफारशींनुसार ऑक्सिजनचा आधार दिला पाहिजे. ज्या रूग्णांना ऑक्सिजन उपचार आवश्यक आहेत, त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गंभीर कोविड रुग्ण –

ज्या करोनाबाधि रूग्णांची ऑक्सिजन पातळी ९० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे. अशा रुग्णांना वेंटिलेशनवर ठेवावे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ऑक्सिजनची मागणी वाढलेल्या रुग्णांमध्ये एनआयव्ही (हेल्मेट किंवा फेस मास्क इंटरफेस, उपलब्धतेवर अवलंबून)चा वापर केला पाहिजे. इतर उपचारांमध्ये ५ ते १० दिवसांसाठी दाहक विरोधी औषध (मिथाइलप्रेडनिसोलोन 1 ते 2mg/kg IV दोन विभाजित डोसमध्ये किंवा डेक्सामेथासोनचा समतुल्य डोस) समाविष्ट आहे.

खोकला दोन-तीन आठवड्यांहून अधिक काळ टिकून राहिल्यास, क्षयरोग आणि इतर बाबींची तपासाणी करून घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या प्रौढ करोनाबाधित रूग्णांच्या व्यवस्थापनासाठी सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revised clinical guidance for the management of adult covid 19 patients msr
First published on: 18-01-2022 at 11:36 IST