आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र ही चर्चा सकारात्मक कारणासाठी नसून या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या उडालेल्या गोंधळामुळे आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केलेली असताना काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

घडलं काय?
झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
Chhagan Bhujbal on Hemant Godse
नाशिकमधून छगन भुजबळ यांची माघार! पंतप्रधान मोदी-शाहांचे आभार मानत म्हणाले…
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
history of ramleela maidan
रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र

नक्की पाहा >> पंतप्रधान मोदी तर कालकेयची भाषा बोलू लागले, PM प्रॉम्टरजीवी निघाले; मोदींचा गोंधळ उडल्यानंतर Memes झाले Viral

या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय.

राहुल गांधींचा टोला
राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलीय. “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.

दरम्यान यापूर्वीच काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मिम्सची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सोमवार रात्रीपासूनच या प्रकरणाशीसंबंधित #TeleprompterPM #Teleprompter #TeleprompterFail #TeleprompterJeevi हे हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे.