ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू व्यक्ती देशाचे प्रमुख झाल्यासंबंधी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आपल्या नियुक्तीमुळे देशातील विविधता दिसत असल्याचं ऋषी सुनक यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या पंतप्रधानपदाच्या लढाईत आपण माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी बाजूला होण्यास नकार दिल्याचं सांगितलं.

देशात वाढलेली महागाई आणि वाढलेला खर्च लक्षात घेता देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपण योग्य व्यक्ती असल्याचं ऋषी सुनक म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी अर्थमंत्री असताना आपण केलेल्या कामाचा दाखलाही दिला. “हे नक्कीच आश्चर्यकारक होतं. अनेकांसाठी ही घडामोड फार महत्त्वाची आहे,” असं सुनक यांनी म्हटल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे.

Raj Thackeray
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन
Dp Campaign by aap
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता ‘डीपी मोहिम’; आप नेत्या म्हणाल्या, “आज दुपारपासून…”

ऋषी सुनक यांनी यावेळी आपण जॉन्सन किंवा आपल्या माजी प्रमुखांसाठी नेतृत्वातून माघार घेण्यासंबंधी विचार करण्याचं स्पष्ट केलं. “संसदेतील सहकाऱ्यांचा मला पाठिंबा असल्याने माझी भूमिका स्पष्ट होती. या पदासाठी मीच सर्वात जास्त योग्य व्यक्ती आहे असं मला वाटतं,” असं त्यांनी सांगितलं.

४२ वर्षीय ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा जन्म साउथॅम्प्टनमध्ये झाला. त्यांचे वडील यशवीर हे डॉक्टर, तर आई उषा या फार्मासिस्ट आहेत. सुनक यांचे आजी-आजोबा मुळचे पंजाबचे. त्यांचे शिक्षण प्रख्यात विन्चेस्टर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण ऑक्सफर्डमध्ये घेतले, तर कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी घेतली. सुमारे तीन वर्षे त्यांनी खासगी कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता यांची आणि सुनक यांची भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली. २००९मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या मुली आहेत.

सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होतं. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणं अशक्यप्राय असल्याचं लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली.