scorecardresearch

Premium

सावधान, २०३० पासून आग, पूर, दुष्काळ, साथीरोगाचा धोका वाढणार, दरवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना – UN

आगामी काळात जागतिक हवामान बदलाचे अधिक गंभीर परिणाम जगभरात सहन करावे लागणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आगामी काळात जागतिक हवामान बदलाचे अधिक गंभीर परिणाम जगभरात सहन करावे लागणार आहेत. २०१५ पासून हवामान बदलामुळे जगभरात दरवर्षी आग, पूर, दुष्काळ, साथीरोगासारख्या विविध ४०० संकटांचा सामना करावा लागतोय. मात्र, हवामान बदलाचा वेग हाच राहिला तर २०३० पासून जगभरात दरवर्षी अशा ५६० संकटांचा सामना करावा लागणार आहे. यात केमिकल अपघातांचाही समावेश आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) एका समितीने अहवाल दिला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या वैज्ञानिक समितीने दिलेल्या या अहवालानुसार, “हवामान बदल हवामानाशी संबंधित संकटांची तीव्रता, गांभीर्य, कालावधी आणि दुष्परिणामचा स्तर वाढवत आहे. हवामान बदल या संकटांमधील नुकसानाचं मोठं कारण आहे. १९७० ते २००० या काळात जगभरात दरवर्षी केवळ ९० ते १०० मध्यम आणि मोठी संकटे येत होती. मात्र, नंतरच्या काळात यात कमालीची वाढ झाली आहे. २०३० मध्ये उष्णतेच्या लाटांची संख्या २००१ च्या तुलनेत तिपटीने वाढेल आणि दुष्काळांच्या संकटात देखील ३० टक्क्याने वाढ होईल.”

love yourself
प्रेम स्वत:वरही करावं..
Rahu Ketu Rashi Parivartan 2023
दीड वर्षांनंतर राहू-केतूच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ पाच राशींना होणार प्रचंड धनलाभ? २०२५ पर्यंत होऊ शकतात कोट्यधीश
global warming
विश्लेषण : जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील पीक पद्धती बदलणार?
Alzheimer
वृद्धावस्थेतील अल्झामायर टाळायचे प्रयत्न आधीपासूनच करायला हवेत…

या अहवालात केवळ नैसर्गिक संकटांविषयीच सांगण्यात आलेलं नाही, तर कोविड १९, आर्थिक पडझड, अन्न तुटवडा यासारख्या हवामान बदलाचा परिणाम झालेल्या संकटांवरही भाष्य करण्यात आलंय. मानवी हस्तक्षेपामुळे संकटांची तीव्रता वाढली आहे. लोकसंख्या अधिक असलेल्या भागात त्यामुळे संकटांचा धोका अधिक वाढला आहे.

“आत्ताच उपाययोजना केल्या नाहीत तर हवामान बदलाची स्थिती आणि त्यामुळे येणाऱ्या संकटांचं स्वरुप नियंत्रणाबाहेर जाईल. लोकांना आतापर्यंत या संकटांनी किती नुकसान केलंय याची कल्पना नाही. संकटांवर खर्च होणाऱ्या निधीपैकी ९० टक्के खर्च आपतकालीन स्थितीसाठी होतो, केवळ ६ टक्के पुनर्निमाण आणि ४ टक्के प्रतिबंधावर खर्च होतो,” असंही संयुक्त राष्ट्राच्या या समितीने म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Risk of catastrophic disasters increasing every year due to climate change say un pbs

First published on: 26-04-2022 at 21:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×