एटीएम फोडण्याच्या उद्देशाने एक मास्क घातलेला चोर एटीएममध्ये शिरला. मात्र सुरक्षा रक्षकाने अडवले. ज्यानंतर एटीएम तोडण्यासाठी आणलेल्या हातोडीने त्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. या झटापटीत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. गोव्यातील पणजी या ठिकाणी असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. या संदर्भातला सीसीटीव्ही व्हिडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. हा व्हिडिओ २७ तारखेचा आहे.

चोरट्याने रात्री एक वाजण्याच्या सुमारास गोव्यातील पणजी या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये प्रवेश केला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधील सुरक्षा रक्षकाने या चोराला अडवले, त्यांच्यात झटापट सुरू झाली. या झटापटीत सुरक्षा रक्षकाने चोराच्या चेहऱ्यावरचा मास्कही काढला. मात्र या सगळ्या दरम्यान चोर सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर हातोडीने घाव घालत होता.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Failed Robbery Attempt
माय-लेकींच्या धाडसाला सलाम! दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांशी भिडल्या; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून आरोपींना अटक

सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर त्याने अनेक घाव घातले. या घटनेत सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचे हे एटीएम पणजी पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. सुरक्षा रक्षकाने चोराचा मास्क काढल्यामुळे या चोराचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो आहे. आता या चोराचा शोध पोलीस घेत आहेत.

पाहा व्हिडिओ