नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी होत आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच याविरोधात काँग्रेत कार्यकर्त्यांकडून देशभरात आंदोलने केली आहेत. दरम्यान, या प्रकरणी आता सोनिया गांधी याचे जावाई रॉबर्ट वाड्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा जेव्हा देशात भाजपाविरोधी वातावरण होते, तेव्हा तेव्हा ते गांधी परिवाराला त्रास द्यायला सुरूवात करतात”, असे ते म्हणाले.

काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा?

भाजपाकडून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. मला तुम्ही एका भाजपा नेत्याचे नाव सांगा, ज्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जेव्हा जेव्हा देशात भाजपाविरोधी वातावरण होते, तेव्हा तेव्हा ते गांधी परिवाराला त्रास द्यायला सुरूवात करतात. देशात जे सुरू आहे, ते योग्य नाही. हे सर्व बदलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Congress Protest Live : “सोनिया गांधी इटलीहून आल्या म्हणत…”; अशोक गेहलोत यांचं टीकाकारांना प्रत्युत्तर

”…म्हणून सोनिया गांधींची ईडी चौकशी ”

देशातली लोक सद्या सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. जीएसटीमुळे अनेकांनी सरकारवर टीका केली आहेत. देशात भाजपाविरोधी वातावरण बनत असल्याने त्यांनी गांधी परिवाराला लक्ष केले आहे. सोनिया गांधींची ईडी चौकशी हा त्याचाच भाग आहे. मी अनेकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलो आहे. त्यामुळे या यंत्रणेला कसे सोमारे जायचे बाबत मी सोनिय गांधी यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसकडून देशभरात निदर्शने

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने सुरू आहे. मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन दडपशाही केल्याचा आरोप करत काँग्रेसचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. तर नागपूरमध्येही आमदार सुनिल केदार, विकास ठाकरे यांच्यासह अनेक नेते रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन खुलेआम दडपशाही केल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.