खनिज तेलाचा भाव ५० टक्क्यांनी भडकण्याचा अंदाज; पेट्रोलचा भावपण आणखी कडाडणार?

मागणी वाढल्याने तेल निर्यात करणार्‍या देशांच्या संघटना आणि त्यांचे सहयोगी केवळ हळूहळू पुरवठा वाढवत आहेत.

Rosneft sees oil price may reach 120 dollar per barrel in 2022

TASS वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरपर्यंत वाढू शकतात, असे रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्टच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने मंगळवारी सांगितले. तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल ८० डॉलरच्या वर आहेत. वाढत्या जागतिक उत्पादनाच्या अंदाजामुळे आणि आणि युरोपमधील ताज्या करोना रुग्णांच्या चिंतेमुळे नफा कमी झाला आहे.

आज ओपेक देश मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात उत्पादन वाढवू शकत नाहीत, असे रशियन कंपनीचे वाणिज्य आणि लॉजिस्टिक्सचे उपाध्यक्ष ओटाबेक करीमोव्ह यांनी मंगळवारी एका परिषदेत सांगितले. परिणामी, आज जगभरात ऊर्जा संसाधनांची खूप गंभीर कमतरता आहे. स्वाभाविकच, याचा किंमतीवर परिणाम होऊ शकत नाही, असेही करीमोव्ह म्हणाले.

या वर्षी क्रूड ऑईल जवळजवळचे दर ६० ते ८२ डॉलर प्रति बॅरल पर्यंत वाढले आहेत कारण करोनातून जग सावरत आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे तर तेल निर्यात करणार्‍या देशांच्या संघटना आणि त्यांचे सहयोगी केवळ हळूहळू पुरवठा वाढवत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की खनिज तेल १०० डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकते. तसेच बँक ऑफ अमेरिकेच्या म्हणण्यानुसार वाटते की २०२२ जूनपर्यंत ते १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते.

रशियाचा सर्वात मोठा तेल उत्पादक, रोझनेफ्ट कराराच्या अंतर्गत उत्पादन निर्बंधांचे पालन करत आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या ओपेकच्या करारामध्ये रशियाच्या सहभागास विरोध केला आहे. २०२२ मध्ये करार संपल्यानंतर त्वरीत उत्पादन वाढवण्याची योजना आहे आणि २०२४ मध्ये भविष्यात व्होस्टोक तेल प्रकल्पातून ३० दशलक्ष टन तेल किंवा सुमारे ६००,००० बॅरल प्रतिदिन उत्पादनाचे लक्ष्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rosneft sees oil price may reach 120 dollar per barrel in 2022 abn