RSS on atrocities against Hindus in Bangladesh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी (३० नोव्हेंबर) एक निवदेन जारी केलं आहे. संघाने बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांनी या निवेदनात म्हटलं आहे की “बांगलादेशात हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मुस्लीम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुलं व महिलांवरील अमानवीय अत्याचार खूप चिंताजनक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटनांचा निषेध नोंदवतो. बांगलादेशमधील सध्याचं सरकार व इतर संरक्षण यंत्रणा, पोलीस व सैन्य या सगळ्या घटनांकडे कानाडोळा करत आहेत”.

होसबाळे यांनी म्हटलं आहे की “बांगलादेशमधील संरक्षण यंत्रणा तिथल्या अलप्संख्याकांना वाचवण्याऐवजी मूकदर्शक बनल्या आहेत. त्याच वेळी बांगलादेशमधील हिंदूंनी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारांनंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या सरकारने त्यांचा आवाज दाबून ठेवला आहे. तिथल्या हिंदूंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र बांगलादेशी सरकारने हिंदूंची आंदोलनं चिरडली. प्रसंगी त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. अशातच तिथल्या हिंदूंच्या शांततेत चालू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे इस्कॉनचे माजी सदस्य व हिंदू संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेशी सरकारने तुरुंगात डांबलं आहे”.

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

हे ही वाचा >> मोठी बातमी! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार, शपथविधीला पंतप्रधानही राहणार हजर

संघाने बांगलादेशी सरकारकडे मागणी केली आहे की त्यांनी तिथल्या हिंदूंवरील अत्याचार थांबवले पाहिजेत. तसेच चिन्मय दास यांना तुरुंगातून मुक्त करावं. भारत सरकारने देखील याची दखल घ्यावी.

इस्कॉनने हात वर केले

चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी या हिंदू नेत्याला सोमवारी झालेली अटक आणि त्यापाठोपाठचा तुरुंगवास यामुळे भारताकडून अधिकृतरीत्या चिंता व्यक्त करण्यात आली असतानाच, चिन्मय दास यांच्या कारवायांशी इस्कॉनचा काहीही संबंध नाही असा खुलासा ‘इस्कॉन बांगलादेश’चे सरचिटणीस चारू चंद्र दास ब्रह्मचारी यांनी केलं आहे.

हे ही वाचा >> Mahadev Jankar: ‘तुमचा एकच आमदार भाजपानं पक्षासह पळविला तर’, महादेव जानकर म्हणाले, “मी शरद पवारांसारखं…”

इस्कॉन बांगलादेश हिंदूंना एकत्र करत असल्याबद्दल आणि जबरदस्तीच्या धर्मांतरांना विरोध केल्यामुळे आम्हाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप चारू दास यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. आमच्या कामामुळे बांगलादेशातील मूलतत्त्ववादी आमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दास म्हणाले.