भारतातील जम्मू, काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादी, फुटीरतावादी कारवाया पाकव्याप्त काश्मीरमधून होत असलेली घुसघोरी अजूनही थांबलेली नाही. याच कारणामुळे या भागात तैनात असलेले सैन्य आणि पोलिसांच्या दहशतवाद्यांशी अनेकवेळा चकमकी झालेल्या आहेत. असे असताना आता आरएसएस सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे आशेने पाहत आहे. तेथील जनतेला स्वातंत्र्य कधी मिळणार, असा सवाल केला आहे.

हेही वाचा >>> Goa Illegal Bar Row : “लेखी माफी मागा” स्मृती इराणींची काँग्रेससह तीन नेत्यांना नोटीस

uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
S jaishankar
“तुमच्या घराचं नाव बदललं तर ते माझं होईल का?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!
Kerala CM Pinarayi Vijayan
‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

“१९४७ सालापासून पाकिस्तानकडून पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद तसेच युद्धाला प्रोत्साहन दिले जात आहे. आपले सैन्य आणि पोलीस मागील अनेक वर्षांपासून याविरोधात लढत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारतीय सैन्यासोबत दहशतवाद, फुटीरतावादाशी लढा देत आहेत. त्यांचे मी आभार मानतो,” असे दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

हेही वाचा >>> “४२ वर्षांपासून राजकारणात, २५ वर्षे आमदार, ३ वेळा मंत्री” उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना सत्तारांनी मांडली कारकीर्द

“पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक दहशतवाद, फुटीरावादाचे बळी ठरत आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पाहत आहेत. त्यांना स्वातंत्र्य कधी मिळणार?” असा सवालही होसबळे यांनी केला.

हेही वाचा >>> “सबका साथ सबका विकास, एक धोका आहे” असदुद्दीन ओवेसींची मोदी सरकारवर टीका

भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कल्म ३७० रद्द केल्यानंतर येथे अस्थितरतेचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या येथील परिस्थिती सामान्य असली तर येथील दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. पाकव्याप्त काश्मीरमधून अजूनही घुसखोरीचे प्रकार घडतात. याच कारणामुळे येथील सैन्य आणि पोलिसांनी कायम सतर्क राहावे लागते. असे असताना आरएसएसने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>> नव्या आव्हानांसाठी भारत सज्ज;मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन 

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त जम्मूमधील गुलशन मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारगिल युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना शिवरुप बाबा अमरनाथ आपल्याकडे आणि आई शारदा शक्ती स्वरुप नियंत्रण रेषेच्या पलीकडे (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) हे कसं असू शकते असा प्रश्नही सिंह यांनी विचारला.