‘बार’मध्ये तरुणीला लागला तरुणाचा धक्का, दोन ग्रूपमध्ये झाला राडा; मारहाणीचा Video व्हायरल

दारुच्या नशेत तरुण-तरुणींची एकमेकांना तुफान मारहाण

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये रविवारी रात्री तरुण-तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली. एका तरुणाचा दुसऱ्या तरुणीला धक्का लागल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीवेळी सर्व तरुण-तरुणी दारुच्या नशेत होते. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लखनऊच्या विभूतीखंड येथील ‘माय बार’मधील ही घटना असून इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विकास नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचा हात ‘माय बार’मध्ये एका तरुणीला लागला. त्यावरुन वाद सुरू झाला आणि दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओत तरुण-तरुणी एकमेकांना बेदम मारताना दिसत आहेत. घटनेनंतर पोलिसांना फोनद्वारे माहिती देण्यात आली, पण पोलिस येईपर्यंत सर्वजण फरार झाले होते. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरू आहे. बघा व्हिडिओ :


ईस्ट झोन विभूतीखंडचे सहायक पोलिस आयुक्त स्वतंत्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “एक व्हिडिओ आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये काही तरुण-तरुणी माय बारच्या बाहेर मारहाण करताना दिसतायेत. पोलीस पोहोचेपर्यंत सर्व फरार झाले होते. सध्या आम्ही गुन्हा दाखल केला असून ओळख पटवून कारवाई सुरू आहे”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ruckus at lucknow bar after youth fistfight in drunken state sas

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या