scorecardresearch

Ruckus in IndiGo flight : इंडिगोच्या विमानात तीन मद्यधुंद युवकांचा गोधळ; एअर होस्टेसशीही गैरवर्तन, दोघांना अटक

एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता तीन युवकांनी इंडिगोच्या विमानात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Ruckus in IndiGo flight : इंडिगोच्या विमानात तीन मद्यधुंद युवकांचा गोधळ; एअर होस्टेसशीही गैरवर्तन, दोघांना अटक
इंडिगोच्या विमानात तीन मद्यधुंद युवकांचा गोधळ; एअर होस्टेसशीही गैरवर्तन, दोघांना अटक

Delhi Patna Flight Youth Ruckus : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद युवकाने महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता तीन युवकांनी इंडिगोच्या विमानात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीहून पाटणा जाणाऱ्या विमानात रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, बिहार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून एका आरोपी शोध सुरू आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री ९ च्या सुमारास इंडिगोच्या 6E-6383 विमानात तीन युवकांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पायलट आणि एअर होस्टेसने त्यांना समाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एअर होस्टेसला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती पायलटने एअर ट्राफीक कंट्रोलला दिल्यानंतर सीआयएसएफने दोन आरोपींना पाटणा विमानतळावर अटक केली. तसेच एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला.

पाटणा विमानतळावर तैनात एसएचओ रॉबर्ट पीटर यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणातील दोन्ही आरोपींना पाटणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून रोहित कुमार, नितिन कुमार आणि पिंटू कुमार, अशी या युवकांची नावे आहे. हे तिघेही पाटणाचे रहिवासी आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बंगळुरूमधून अटक केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 15:42 IST

संबंधित बातम्या