उत्तराखंडमधल्या हिमालयातील रुद्रप्रयाग आणि टिहरी घारवाल या जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. १९८८ ते २०२२ पर्यंत झालेल्या सुमारे ८० हजार भूस्खलनाच्या घटनांचा हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. त्यात ही बाब समोर आली आहे. याअभ्यासासाठी इस्त्रोच्या उपग्रहाची मदत घेतली गेली.

पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानातील बदलांमुळे हा धोका वाढला आहे. १७ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १४७ ठिकाणं भूस्खलन प्रभावित क्षेत्र असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

प्रमुख तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळं आणि वाढलेल्या लोकसंख्येमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आणि ईशान्येकडील ६४ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र, तिथे भूस्खलनाचे प्रमाण कमी असले तरी लोकसंख्येमुळे मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागत आहे.

भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असलेल्या चार देशांत भारताचा समावेश आहे. बर्फाच्छादित क्षेत्र वगळता १२.६ टक्क्यांहून भागाला भूस्खलनाचा धोका आहे. यात हिमालय, पश्चिम घाट, कोकण टेकड्या आणि पूर्व घाटांचा समावेश आहे.