scorecardresearch

Premium

धीरेंद्र शास्त्रींचं प्रवचन ऐकून रुखसाना बनली रुक्मिणी, हिंदू प्रियकराबरोबर लग्नगाठ बांधण्याआधी म्हणाली, “सनानत धर्म…”

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं प्रवचन ऐकून बिहारमधल्या रुखसानाने सनातन धर्मी स्वीकारला असून तिचं नाव आता रुक्मिणी असं झालं आहे.

Dhirendra Krishna Shastri
धीरेंद्र शास्त्री

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु कोणत्याही वक्तव्यामुळे नव्हे तर त्यांचं प्रवचन ऐकून एका तरुणीने धर्मांतर केल्यामुळे चर्चेत आले आहेत. धीरेंद्र शास्त्रींचं प्रवचन ऐकून मुजफ्फरपूरमधील २२ वर्षीय रुखसाना ही तरुणी आता रुक्मिणी झाली आहे. दोघांनी आधी हाजीपूर येथे गंडक नदीत डुबकी घेतली, मग हिंदू पद्धतींनुसार एका मंदिरात सात फेरे घेतले. तिचा पती वैशाली येथील रहिवासी आहे.

मुझफ्फरपूरमधील गिजान्समधली रहिवासी नौशीन परवीन उर्फ ​​रुखसाना आणि वैशाली येथील रहिवासी रोशन कुंवर (२५) हे दोघे २०१८ मध्ये जयपूर येथील एसआरपीएस कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले होते. तिथेच दोघांची मैत्री झाली. मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चार वर्ष एकमेकांना डेट करून आता या दोघांनी लग्न केलं आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

दोघांनी आधी आपापल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. रोशनच्या आई-वडिलांनी लग्नाला होकार दिला. परंतु रुखसानाच्या घरच्यांनी या लग्नाला तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर तरुणी रोशनला म्हणाली, मी सनानत धर्म स्वीकारेन मग लग्न करेन. त्यानंतर रुखसानाने सनातन धर्माचा स्वीकार केला, रुखसाना रुक्मिणी झाली. त्यानंतर रविवारी वैशाली येथील लालगंजमधल्या रेपुरामधील अर्धनारीश्वर महादेव मंदिरात दोघांनी सात फेरे घेतले.

काय म्हणाली रुक्मिणी?

या लग्नाबद्दल तरुणीने दैनिक भास्करला सांगितलं की, जयपूरमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मी मुस्लीम आहे. परंतु मी रोशनला सांगितलेलं सनातन धर्माचा स्वीकार करेन मग लग्न करेन. मला बागेश्वर बाबांकडून हिंदू धर्म स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचं प्रवचन ऐकूनच मी हा निर्णय घेतला. मी स्वतः रोशनला लग्नासाठी विचारलं होतं.

हे ही वाचा >> “पुणे लोकसभा काँग्रेसलाच मिळायला हवी, कारण…”, नाना पटोलेंनी दंड थोपटले, अजितदादांच्या दाव्यावर उत्तर देत म्हणाले…

रोशन म्हणाला, आम्ही या लग्नामुळे खूप आनंदी आहोत. रुख्सानाने तिच्या मर्जीने सनातन धर्म स्वीकारला आहे आणि मग माझ्याशी लग्न केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rukhsana became rukmini for lover got married after listening dhirendra krishna shastri aka bageshwar baba asc

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×