रशियाचा पुन्हा युक्रेनवर हल्ला, डागली १०० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे; वीजपुरवठाही खंडीत

रशियाने गुरुवारी सकाळी युक्रेनवर १०० पेक्षा जास्त मिसाईल डागल्याच्या दावा युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

Russia Missiles fire on Ukraine
फोटो सौजन्य – जनसत्ता

रशियाने गुरुवारी सकाळी युक्रेनवर १०० पेक्षा जास्त क्षेपणास्रे डागल्याच्या दावा युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपासून संपूर्ण युक्रेनमध्ये सायरन वाजत असून राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण युक्रेनमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याचीही महिती आहे.

हेही वाचा – चीनमधून इटलीमध्ये पसरतोय करोना; विमानातील ५० टक्के प्रवासी पॉझिटिव्ह

या हल्ल्याबाबत युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. “गुरुवारी सकाळी युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्रे डागली आहेत. या क्षेपणास्रांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे”, असे ते म्हणाले. तसेच रशियाने डागलेली अनेक क्षेपणास्रे निष्क्रिय करण्यात आल्या असल्याची माहिती युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचबरोबर रशियाकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे देशातील पायाभूत सुविधा नष्ट होत असल्याचा आरोपही युक्रेनकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘PFI’ पुन्हा ‘NIA’च्या रडारावर; केरळमध्ये पहाटेच तब्बल ५६ ठिकाणी छापेमारी!

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. गुरवारी पुन्हा एकदा एकदा रशियाने युक्रेनवर क्षेपणास्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. राजधानी कीवसह पश्चिमेस असलेल्या पोलंड सीमेजवळील काही शहरांमध्ये हा हल्ला झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यांमुळे संपूर्ण युक्रेनमध्ये वीज समस्या निर्माण होत असल्याचेही सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 15:09 IST
Next Story
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! राजेशाही थाटातील सोहळ्यामधील पहिला फोटो आला समोर
Exit mobile version