Premium

कीव्हवर मोठा ड्रोन हल्ला, एक जण मृत्युमुखी  

युक्रेनची राजधानी कीव्हचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना रशियाने या शहरावर सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला केला.

attack on ukrain
कीव्हवर मोठा ड्रोन हल्ला

एपी, कीव : युक्रेनची राजधानी कीव्हचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना रशियाने या शहरावर सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी कीव्ह शहरात झाली होती. तेव्हाच हा हल्ला झाला, त्यात एक नागरिक मृत्युमुखी पडला. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने केलेला हा सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाने शनिवारी रात्री इराणी बनावटीच्या ‘शाहेद ड्रोन’द्वारे कीव्हवर हा सर्वात मोठा हल्ला केला, असे कीव्ह येथील युक्रेनचे लष्करी अधिकारी सेर्ही पोप्को यांनी सांगितले. हा हल्ला पाच तासांपेक्षा जास्त काळ चालला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ४० हून अधिक ‘ड्रोन’ पाडले.  कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले, की या हल्ल्यात एक सात मजली अनिवासी इमारत कोसळली व तिला आग लागली. या ढिगाऱ्याखाली एक ४१ वर्षीय नागरिक मृत्युमुखी पडला. एक ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia major drone attack on kiev one dead ysh