रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले. 

“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असं बायडेन म्हणाले आहेत.

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
United Nations
इस्रायल-हमास युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रासंघाचा ठराव, भारत मात्र गैरहजर; नेमकं कारण काय?
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द

Live Updates

Russia Ukraine War : रविवारी रशियाने बेलारुसमध्ये दिलेली चर्चेची ऑफर युक्रेनच्या अध्यक्षांनी नाकारली आहे.

20:48 (IST) 27 Feb 2022
कॅनडाचे हवाई मार्ग रशियासाठी बंद

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे कॅनडाने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द तात्काळ बंद केली आहे, असे कॅनडाचे परिवहन मंत्री म्हणाले.

20:28 (IST) 27 Feb 2022
पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

https://twitter.com/LoksattaLive/status/1497947837925302274

20:26 (IST) 27 Feb 2022
पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठक बोलावणार

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

20:04 (IST) 27 Feb 2022
विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

https://twitter.com/LoksattaLive/status/1497936687519133698

20:04 (IST) 27 Feb 2022
“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

https://twitter.com/LoksattaLive/status/1497935531510214661

20:02 (IST) 27 Feb 2022
युक्रेनने रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं ; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले...

https://twitter.com/LoksattaLive/status/1497923014012268544

20:01 (IST) 27 Feb 2022
"तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत...", युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं 'ते' आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

https://twitter.com/LoksattaLive/status/1497915075969298433

20:00 (IST) 27 Feb 2022
उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनला आता थेट एलोन मस्कची साथ, रशियाचे जोरदार हल्ले सुरू असताना केली 'ही' मदत

https://twitter.com/LoksattaLive/status/1497891520644808704

19:43 (IST) 27 Feb 2022
पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

रशिया-युक्रनेमधील युद्ध चिघळण्याची शक्यता, जगावर अणुयुद्धाचं सावट, पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

https://twitter.com/LoksattaLive/status/1497940299909570568

18:53 (IST) 27 Feb 2022
त्यांची मतदानाची शक्ती काढून घ्या

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाची मतदानाची शक्ती काढून टाकण्याचे आवाहन केलं आहे.

18:28 (IST) 27 Feb 2022
रशियाशी बेलारुसमध्ये चर्चा करण्यास युक्रेन तयार

मॉस्कोमधील बेलारूस येथे रशियाशी चर्चा करण्यास युक्रेन तयार आहे, असं वृत्त रशियन स्टेट मीडियाने दिलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

17:54 (IST) 27 Feb 2022
युक्रेनने चर्चेची संधी गमावली, पुतीन यांचा इशारा

युक्रेनने चर्चेची संधी वाया घालवल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. रशियाने चर्चेसाठी आमंत्रण दिल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी बेलारुसमध्ये चर्चेसाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं.

17:36 (IST) 27 Feb 2022
रशियन सैन्याला माघारी पाठवत खार्किव शहर ताब्यात घेतलं, युक्रेनचा दावा

युक्रेनमधीन खार्किव शहरामध्ये रशियन सैन्याने प्रवेश केला होता आणि दोन्ही देशाच्या सैन्यात युद्ध सुरू होतं. परंतु रशियन सैन्याला माघारी पाठवत खार्किव शहर ताब्यात घेतलं आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

17:00 (IST) 27 Feb 2022
साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांचं युक्रेनमधून पलायन

रशियाने गुरुवारी आक्रमण केल्यानंतर ३,६८,००० हून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे, अशी माहिती एएफपीने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:35 (IST) 27 Feb 2022
युक्रेनचं मोठं पाऊल, रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केला अर्ज

"युक्रेनने रशियाच्या विरोधात आपला अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केला आहे. आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो," असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:27 (IST) 27 Feb 2022
केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:25 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने परत आणणार - राजनाथ सिंह

"युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने देशात परत आणले जाईल. यासाठी आम्ही युक्रेनच्या शेजारील देशांच्या परवानगीने विमानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

16:11 (IST) 27 Feb 2022
रशियाचे ४,३०० सैनिक मारले गेले, युक्रेनचा दावा

रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान सुमारे ४,३०० सैनिक गमावले आहेत, असा दावा युक्रेनचे उप संरक्षण मंत्री हन्ना मल्यार यांनी रविवारी केला.

15:58 (IST) 27 Feb 2022
चेक रिपब्लिकचा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रशियाशी खेळण्यास नकार

https://platform.twitter.com/widgets.js

चेक रिपब्लिकने 2022 विश्वचषक प्ले-ऑफमध्ये रशियाशी खेळण्यास नकार दिला आहे.

15:55 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमध्ये अडकलेले गुजरातचे विद्यार्थी परतले मायदेशी

युक्रेनमध्ये अडकलेले गुजरातचे विद्यार्थी अहमदाबादमध्ये परतले आहेत. हे विद्यार्थी काल मुंबईला पोहोचले होते, तेथून आज अहमदाबामध्ये परतले.

https://platform.twitter.com/widgets.js

15:25 (IST) 27 Feb 2022
पुतीन यांचं ज्युदो फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून निलंबन

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आंतरराष्ट्रीय ज्युदो फेडरेशनचे (IJF) मानद अध्यक्ष म्हणून निलंबित करण्यात आले आहे, अशी घोषणा क्रीडा प्रशासकीय समितीने केली.

15:04 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमधील विद्यार्थी अडचणीत - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

"खार्किव आणि किव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी भारत सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांना सीमेजवळ आणावे जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. तसेच, इव्हॅक्युएशन प्लेनची संख्या वाढवायला हवी,"

https://platform.twitter.com/widgets.js

अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.

14:42 (IST) 27 Feb 2022
भारतीयांनी किव्हमधून पश्चिम भागात निघून जावं, युक्रेनमधील भारतीय दुतावासाचं आवाहन

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले आहे की, "युक्रेन रेल्वे कोणत्याही खर्चाशिवाय आपत्कालीन गाड्यांचे आयोजन करत आहे. किव्ह येथून प्रथम या आणि जागा मिळवा या तत्त्वावर या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात वेळापत्रक रेल्वे स्थानकांवर आढळेल.”

दरम्यान, सध्याची किव्हमधील परिस्थिती पाहता अडकलेल्या भारतीय लोकांना देशाच्या पश्चिम भागात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

14:38 (IST) 27 Feb 2022
“रशियाकडून आलेली चर्चेची ऑफर स्वीकारा;” बेलारूसच्या नेत्यांची झेलेन्स्की यांना विनंती

बेलारशियन नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी रविवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना रशियाशी चर्चा करण्याचे आवाहन केले. रशियाकडून आलेली चर्चेची ऑफर स्वीकारा, जेणेकरून तुम्ही तुमचे राज्यत्व गमावणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. रशियाच्या RIA वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

14:20 (IST) 27 Feb 2022
फिनलंडने रशियन विमानांसाठी बंद केले हवाई क्षेत्र

फिनलंड इतर युरोपीय देशांच्या राफ्टमध्ये सामील होऊन रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करेल. फिनलंड "रशियन हवाई वाहतुकीसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची तयारी करत आहे," असे परिवहन मंत्री टिमो हरक्का यांनी ट्विटरवर लिहिले. फिनलंडची रशियाशी ८०० मैलांची सीमा आहे.

13:34 (IST) 27 Feb 2022
रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही - वोलोडिमिर झेलेन्स्की

रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. .रशियाने बेलारशियन प्रदेशातून युक्रेनवर हल्ला केला नसता तर मिन्स्कमध्ये चर्चा होऊ शकली असती, असे युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले.

#breaking Zelensky says ready for talks with Russia, but not in Belarus pic.twitter.com/uew5fSvJJ7— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
13:11 (IST) 27 Feb 2022
हा रशियाने केलेला आणखी एक युद्ध गुन्हा

युक्रेनच्या सैन्याने आज सकाळी बेलारशियन Tu-22 विमानातून किव्ह येथे गोळीबार करणारे “विंग रॉकेट” पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाचे कमांडर-इन-चीफ Valerii Zaluzhnyi एका निवेदनात ही माहिती दिली आहे. "हा रशियन फेडरेशन आणि रशियाने युक्रेनच्या लोकांविरोधात केलेला आणखी एक युद्ध गुन्हा आहे," असंही ते म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js
12:42 (IST) 27 Feb 2022

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे, असे प्रादेशिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

12:38 (IST) 27 Feb 2022
अडकलेल्या लोकांसाठी इस्कॉन मंदिराची दारं उघडली

युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्कॉनने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. "संपूर्ण युक्रेनमधील इस्कॉनची मंदिरे गरजू लोकांच्या सेवेसाठी तयार आहेत. आमचे भक्त आणि मंदिरे संकटात सापडलेल्यांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आमच्या मंदिराचे दरवाजे सेवेसाठी खुले आहेत", असं कोलकाता येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी शनिवारी सांगितले.

12:18 (IST) 27 Feb 2022

रशियाने युक्रेनच्या दक्षिण आणि आग्नेय भागात दोन मोठ्या शहरांना वेढा घातल्याचा दावा केला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

12:17 (IST) 27 Feb 2022
रोमानियाहून चौथं विमान मायदेशी परतलं

ऑपरेशन गंगा सुरू असून रोमानियाहून चौथं विमान १९८ भारतीयांना घेऊन दिल्लीसाठी परत निघालं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

12:12 (IST) 27 Feb 2022
२४० भारतीयांना घेऊन तिसरे विमान बुडापेस्टहून दिल्लीला पोहोचले

युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. Ukraine-Russia War : २४० भारतीयांना घेऊन तिसरे विमान बुडापेस्टहून दिल्लीला पोहोचले ; सुखरूप मायदेशी परतल्याचा नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

https://platform.twitter.com/widgets.js

11:46 (IST) 27 Feb 2022
ICRC ने रशियन सैनिकांचे मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस या जिनिव्हास्थित मानवाधिकार संघटनेने सांगितले की, युक्रेनमधील युक्रेनचे राजदूत आणि इतरांनी युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांचे मृतदेह त्यांच्या देशांना परत करण्याच्या विनंतीबद्दल कल्पना आहे. परंतु आतापर्यंत किती सैनिक मारले गेले याची आकडेवारी आमच्याकडे नाही. आतापर्यंत साडेतीन हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

राजदूत सर्गेई किसलित्स्या यांनी शनिवारी ट्विट केले, "सैनिकांच्या पालकांना सन्मानाने मुलांचा अंत्यसंस्कार करण्याची संधी दिली पाहिजे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ही शोकांतिका लपवू नये," असे त्यांनी आवाहन केले.

11:27 (IST) 27 Feb 2022
वैद्यकीय शिक्षणासाठी मुलं बाहेर देशात जात असल्याने पैसा देशाबाहेर जातोय - पंतप्रधान मोदी

वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय मुलं जगभरात जातात. तिथं भाषेची अडचण आहे. तरीही ते जातात. त्यामुळे देशातील पैसा देखील भारताबाहेर जातो. मुलं शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये, यासाठी प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने योजना राबवाव्या, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. युक्रेनमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:22 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमधून २५० भारतीयांना घेऊन दुसरे विमान परतले

एअर इंडियाचे दुसरे विमान युक्रेनमधून २५० भारतीयांना घेऊन दिल्लीत आले

युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान शनिवारी रात्री उशिरा रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर पोहोचले. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

11:20 (IST) 27 Feb 2022
युक्रेनच्या ट्रेनमध्ये लंगर सेवा

युक्रेनमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे पोलिश सीमेपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या वेगवेगळ्या देशांतील लोकांना हरदीप सिंग लंगरच्या माध्यमातून जेवण पुरवत आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:16 (IST) 27 Feb 2022
अमेरिका, सहयोगी देश काही रशियन बँकांना 'स्विफ्ट'पासून वेगळे करणार

युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि त्याचे मित्र आणि मित्र राष्ट्रांनी बंदी घातलेल्या रशियन बँकांना जागतिक वित्तीय प्रणाली 'स्विफ्ट' वित्तीय प्रणालीतून काढून टाकण्याचा आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि कॅनडाच्या नेत्यांनी शनिवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बंदी घातलेल्या रशियन कंपन्या आणि कुलीन वर्गाच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

11:14 (IST) 27 Feb 2022
किव्हमध्ये सोमवापर्यंत कर्फ्यू

युद्धामुळे हजारो युक्रेनियन लोकांनी आपली घरे सोडली आहेत. UN अधिकार्‍यांनी सांगितले की युक्रेनमधून १ लाख २० हजारांहून अधिक लोक पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारील देशांमध्ये निघून गेले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत शहरातील कर्फ्यू सुरू राहणार असल्याचे किव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियन सैन्य राजधानीच्या दिशेने कूच करत आहे.

11:10 (IST) 27 Feb 2022
जपानी अब्जाधीशांची युक्रेनला मदत

जपानी अब्जाधीश हिरोशी ‘मिकी’ मिकितानी यांनी रशियाच्या आक्रमणाला लोकशाहीसमोरील आव्हान म्हणत युक्रेन सरकारला ८.७ दशलक्ष डॉलर्सची मदत देणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक राकुटेन यांनी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना पत्र लिहिलं आहे.

10:42 (IST) 27 Feb 2022

"आम्ही सुमारे २०० रशियन सैनिकांना पकडले आहे, त्यापैकी काही फक्त १९ वर्षांचे आहेत. ते अजिबात प्रशिक्षित नाही. आम्ही त्यांच्या पालकांना याबद्दल फोन करून सांगितलं असता त्यांना धक्का बसला आहे." असा दावा युक्रेनिनन मेजर जनरल बोरिस क्रेमेनेत्स्की यांनी केला आहे.

10:37 (IST) 27 Feb 2022

रशियन सैन्याने सर्व बाजूंनी युक्रेनची राजधानी किव्हकडे येण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पहाटे वासिल्किवमध्ये राजधानीच्या दक्षिणेला दोन मोठे स्फोट ऐकू आले, अशी बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली.

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे, असे प्रादेशिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले.