scorecardresearch

रुग्णालयावरील रशियाच्या हल्ल्यात २ जण ठार

रात्री केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार व नऊ जण जखमी झाल्याचे युक्रेनच्या एका लष्करी कमांडरने सांगितले.

रशियाने सेव्हरदोनेत्सक शहरासह अनेक शहरात रविवारी हल्ला केला. यावेळी रूग्णालये, शाळांना लक्ष्य करण्यात आले.

एपी, किव्ह : रशियाने सेव्हरदोनेत्सक शहरातील एका रुग्णालयावर रात्री केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार व नऊ जण जखमी झाल्याचे युक्रेनच्या एका लष्करी कमांडरने सांगितले. रात्रभरात चाललेल्या या हल्ल्यांचा इतर शहरांनाही फटका बसला.

 रशियाचे आक्रमण रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनच्या विशेष लष्करी दलांनी रशियाच्या ताब्यातील रुबिझेन आणि सेव्हरदोनेत्सक दरम्यानचे रेल्वे पूल उडवून दिले असे सांगून युक्रेनचे क्षेत्रीय लष्करी गव्हर्नर सेरही हैदाई यांनी असा स्फोट दर्शवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. या माहितीची लगेचच स्वतंत्ररित्या खातरजमा होऊ शकली नाही.

 गेले अनेक वर्षे फुटीरवाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच्या बाहेरील दोनबास प्रांतातील एक प्रमुख ठिकाण असलेले सेव्हरदोनेत्सक ताब्यात घेण्याचा रशियन फौजा गेल्या काही आठवडय़ांपासून प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine crisis two killed in russian attack on hospital in ukraine zws

ताज्या बातम्या