scorecardresearch

इंग्लंडच्या राणीचा गार्ड युक्रेनच्या सीमेवर; इंग्लंड युद्धात उतरल्याचं पुतिन यांना वाटेल अशी लष्करी अधिकाऱ्यांना भीती

इंग्लंडच्या राणीच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे चार लष्कर जवान युक्रेनला गेल्याची भीती आहे

Russia Ukraine War, Britain Queen Guard, England, Enland Queen,
इंग्लंडच्या राणीच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे चार लष्कर जवान युक्रेनला गेल्याची भीती आहे

इंग्लंडच्या राणीच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे चार लष्कर जवान युक्रेनला गेल्याची भीती आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, युक्रेनमध्ये घुसखोरी केलेल्या रशियाच्या सैनिकांविरोधात लढण्यासाठी ब्रिटनमधील हे चार लष्कर जवान गेले आहेत. यामध्ये एक अल्पवयीन असून कोणतीही रजा न घेता ते गेले आहेत. जर हे चार जवान पकडले गेले तर इंग्लडंदेखील युद्धात सहभागी झाल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन करतील अशी भीती आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संरक्षण मंत्रालयाने या चौघांचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणीच्या १९ वर्षीय सुरक्षारक्षकाने आपली कोल्डस्ट्रीम गार्ड्समन म्हणून आपली औपचारिक जबाबदारी सोडली असून युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी नोंद केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या सुरक्षारक्षकाची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

Russia Ukraine War Live: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदींचे मानले आभार

या जवानाने पोलंडला जाण्यासाठी एकमार्गी तिकीट बुक करताना आपल्या पालकांना पत्र लिहिलं आहे. पोलंडमधून सीमारेषा पार करुन युक्रेनला जाण्याचा त्याचा हेतू असावा. सन वृत्तपत्रानुसार, यानंतर त्याने स्नॅपचॅटवर आपल्या बुटांचे फोटो पोस्ट केले आहेत.

मात्र या घडामोडीमुळे संरक्षण मंत्रालयात मात्र भीती पसरली आहे. या जवानांना युद्धात सामील होण्यापासून रोखलं जावं यासाठी संरक्षण प्रमुख प्रयत्न करत आहेत. कारण इंग्लंडचे जवान युद्धात लढताना दिसले तर रशिया इंग्लंडनेही युद्धात प्रवेश केल्याचा दावा करण्याची भीती आहे.

युक्रेन बॅकफूटवर; नेटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली तेव्हाच जर कोणत्याही देशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर इतिहासाच कधीच भोगावे लागले नाहीत अशा परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकीच दिली होती.

माजी लष्कर प्रमुखांनी या लष्कर जवानांचं वागणं फारच बेजबाबदार असून पुन्हा ब्रिटनमध्ये परतल्यास त्यांना जेल होऊ शकते असं म्हटलं आहे. आतापर्यंत फक्त एका माजी सैनिकाने युक्रेनच्या युद्धात सहभाग नोंदवला असून सध्या कार्यरत असणाऱ्या जवानांना मात्र यापासून रोखण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine war britain queen guard soldiers goes to fight in ukraine sgy

ताज्या बातम्या