एपी, वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेन ऊर्जा क्षेत्रातील शस्त्रसंधीसाठी तयार झाले असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केले. मात्र, त्यांनी या बाबत काही सविस्तर तपशील दिले नाहीत. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर रशियाने तातडीने काही प्रतिक्रयिा व्यक्त केली नाही, तर ‘मला हे नव्याने समजत आहे,’ अशी प्रतिक्रयिा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झिल्येन्स्की यांनी दिली. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर टिप्पणी करून रशिया-युक्रेनमधील ‘ऊर्जा शस्त्रसंधी’ची घोषणा केली.
रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करार झाला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी होणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस युक्रेन आणि रशिया एकमेकांच्या ऊर्जाक्षेत्रावर हल्ले करीत आहेत. अमेरिका-रशिया तेलकराराच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झिल्येन्स्की यांच्यावर ट्रम्प यांनी रशियावरील तेलसुविधा प्रकल्पांवरील हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
तसेच, युक्रेनला आता नव्या नेत्याची गरज आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी शस्त्रसंधीबाबतची घोषणा ट्रम्प यांनी केली. युक्रेनच्या रशियावरील हल्ल्यांमुळे जगामध्ये इंधनतुटवडा होत असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर व्हाइट हाऊसनेही काही प्रतिक्रयिा दिलेली नाही.
