scorecardresearch

हवाई दलाच्या चार विमानांतून ७९८ भारतीय परत

भारतीय हवाई दलाचे बुखारेस्टहून आलेले चौथे विमान सकाळी ८.१५ वाजता हिंडन तळावर उतरले.

’ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून परतलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला

नवी दिल्ली : रुमानियाची राजधानी बुखारेस्ट व हंगेरीची राजधानी बुडापेस्ट यांच्यासह पोलंडमधील झेशुफ शहरांतून ७९८ भारतीयांना घेऊन आपली चार विमाने गुरुवारी सकाळी गाझियाबादमधील िहडन हवाई तळावर उतरल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली.

बुखारेस्टहून २०० जणांना घेऊन आलेले विमान दुपारी १.३० वाजता येथे उतरले. दुसऱ्या विमानाने २१० भारतीयांना बुडापेस्टहून परत आणले. दुसऱ्या विमानानंतर काही वेळातच झेशुफ येथून उडालेल्या विमानातून २०८ भारतीय हिंडन तळावर येऊन पोहोचले.

भारतीय हवाई दलाचे बुखारेस्टहून आलेले चौथे विमान सकाळी ८.१५ वाजता हिंडन तळावर उतरले. प्रामुख्याने विद्यार्थ्यांसह १८० जण या विमानात होते, असे हवाई दलाने एका निवेदनात सांगितले. हवाई दलाची ही चारही उड्डाणे सी-१७ या लष्करी वाहतूक विमानातून झाली.

स्थलांतरितांच्या स्वागतासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट हे हवाई तळावर उपस्थित होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दल गुरुवारी आणखी तीन विमाने युक्रेनच्या शेजारी देशांतील निरनिराळय़ा ठिकाणी पाठवत आहे, अशी माहिती हवाई दलाने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine war four indian air force planes bring 798 indian students home zws

ताज्या बातम्या