scorecardresearch

मदतीबद्दल युक्रेनकडून भारताचे आभार ; झेलेन्स्की-मोदी यांचा दूरध्वनीवर संवाद

झेलेन्स्की यांनी सुमारे ३५ मिनिटे मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

युक्रेनच्या कीव्ह शहराबाहेरील इरर्पिन भागातून देशाबाहेर जात असलेल्या लोकांना स्थानिक अधिकारी मदत करीत आहेत.

कीव्ह : रशियाने आपल्या देशावर केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या आवश्यकतेबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली असून, युक्रेनच्या लोकांना मदत देणे सुरू ठेवल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले.

झेलेन्स्की यांनी सुमारे ३५ मिनिटे मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

‘युद्धकाळात आपल्या नागरिकांना केलेल्या मदतीचे, तसेच सर्वोच्च स्तरावर शांततामय संवाद साधण्याबाबत युक्रेनच्या बांधिलकीचे भारत कौतुक करतो. युक्रेनी लोकांच्या मदतीसाठी आम्ही कृतज्ञ आहोत. रशियाला थांबवा,’ असे झेलेन्स्की यांनी लिहिले.

युक्रेनच्या आग्नेयेकडील सुमी शहरात अडकून पडलेल्या भारतीयांच्या स्थलांतरासाठी मोदी यांनी झेलेन्स्की यांची मदत मागितली, तसेच युक्रेनमधील संघर्ष निवळण्यासाठी तेथील हिंसाचार तात्काळ थांबवण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा दूरध्वनीवरून संभाषण झाले आहे. युक्रेनच्या कीव्ह शहराबाहेरील इरर्पिन भागातून देशाबाहेर जात असलेल्या लोकांना स्थानिक अधिकारी मदत करीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine war pm modi speaks with ukraine president zelensky zws

ताज्या बातम्या