रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. चर्चेच्या फेऱ्याही निष्फळ ठरल्या आहेत. या दोन्ही देशांच्या युद्धाचा जगभरातल्या इतर अनेक देशांवर परिणाम होत आहे. या युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंडची मात्र गोची झाल्याचं वृत्त समोर येत आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना कबाइवा एका वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पुतीन यांची गर्लफ्रेंड स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित ठिकाणी असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.दरम्यान, अलीनाला देशातून हाकलून देण्याची मागणी होत आहे. स्वित्झर्लंडमधील काही कार्यकर्त्यांनी एक याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये पुतीन यांच्या गर्लफ्रेंडला देशातून हाकलून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
discontent among people against ruling parties leaders in china
चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद


अलिना पुतिन यांच्या तीन मुलांची आई असल्याचं म्हटलं जातं. एक खेळाडू म्हणून अलिनाच्या नावावर अनेक पदके आणि रेकॉर्ड आहेत. मात्र पुतिन यांच्यासोबत नाव जोडल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. पुतिन यांच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे तिला स्वित्झर्लँड आश्रय देण्यास नकार देत आहे, तिला तिथून हाकलण्याची मागणी जोर धरत आहे.


अलीना शेवटची २०१८ मध्ये दोन महिन्यांची गरोदर असताना सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे अलिनाबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र रशियावर चौफेर निर्बंध लादल्यामुळे पुतिन यांनी आपल्या कुटुंबाला स्वित्झर्लंडला पाठवल्याचे मानले जात आहे.


अलिना एक यशस्वी जिम्नॅस्ट आहे. तिनं ऑलिम्पिकमध्ये दोन गोल्ड मेडल, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २५ युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहेत. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला आणि पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाच्या खासदार बनली. अलिना आणि पुतिन यांची नावे २००८ मध्ये पहिल्यांदा एकमेकांशी जोडली गेली होती. रशियन वृत्तपत्र मॉस्कोव्स्की कॉरस्पॉन्डंटने प्रथम पुतिन आणि अलिना यांचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. मात्र काही काळानंतर ही बातमी नाकारण्यात आली आणि रशियन वृत्तपत्र बंद करण्यात आलं. २०१९ मध्ये मॉस्कोमधील रुग्णालयात अलिनाने दोन मुलांना जन्म दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावेळी रुग्णालयाचा व्हीआयपी मजला रिकामा करण्यात आला. मात्र नंतर या वृत्ताचंही खंडन करण्यात आलं.