रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली आहे. दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन भारताकडेही मदत मागणार आहे.

युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहेत. “भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत,” असं ते म्हणाले आहेत.

Coco island and Pandit Neharu
Loksabha Election 2024: भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा? पंतप्रधान नेहरूंच्या निर्णयामुळेच भारताने गमावला का कोको बेटांवरील हक्क?
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

Russia-Ukraine War Live: रशियाने केलेल्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू, नऊ जखमी; युक्रेनची माहिती

“पहाटे ५ वाजता हा निंदनीय हल्ला सुरु झाला आहे. अनेक युक्रेनियन एरोड्रोम, लष्करी विमानतळ, लष्करी विमानतळं, लष्करी व्यवस्थापनं यंच्यावर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत, ” असं भारतातील युक्रेनचे राजदूत यांनी सांगितलं आहे.

भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे – शशी थरुर

रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण सुरू केलं असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मॉस्कोच्या सुरक्षा चिंतेचे कितीही कौतुक केले जात असले तरी युद्धाचा अवलंब करणं किंवा समर्थन करणं अशक्य आहे. भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे असं म्हटलं आहे.

रशियाने युद्ध पुकारल्याने अमेरिकेने निषेध केला असून नव्याने निर्बंध लावणार असल्याचं जाहीर केलं आहे. युरोपियन कमिशनदेखील निर्बंध लावण्याची तयारी केली आहे. तर युक्रेनने मार्शल लॉ लागू केला आहे. तसंच युक्रेन बँकेकडून ग्राहकांवर नवे निर्बंध लादण्यात आले आहेत. युक्रेन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दिवसाला आता ठराविक रक्कमच काढता येणार आहे.