scorecardresearch

…तर तेलाचे भाव ३०० डॉलर प्रतिबॅरलपर्यंतही जातील; रशियाची धमकी

रशियाने तेलाचे भाव वाढवण्याची धमकी दिली आहे.

रशियन तेल आयातीवर बंदी घातल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशा इशारा रशियन उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी सोमवारी दिला आहे. कारण पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनसंदर्भात मॉस्कोवर आणखी निर्बंध घालण्याचा विचार केला आहे. त्यावरून रशियाने तेलाचे भाव वाढवण्याची धमकी दिली आहे.

Russia Ukraine War: तिसऱ्या फेरीतही तोडगा नाहीच! युक्रेन सकारात्मक; तर नाखुश रशिया म्हणतंय, “मॉस्कोच्या…”

“रशियन तेलावरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होतील. किंमतीतील वाढ ही प्रचंड जास्त असेल. तेलाची किंमत प्रति बॅरल ३०० च्या पार जाऊ शकते,” असा इशारा नोव्हाक यांनी रशियन वृत्तसंस्थांशी बोलताना दिलाय. तसेच “या किमती वाढल्यास त्या कमी होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल आणि युरोपियन ग्राहकांना ते महागात पडेल. त्यामुळे युरोपियन राजकारण्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कारण गॅस स्टेशन, विजेच्या आणि हीटिंगच्या किमती गगनाला भिडतील,” असे ते म्हणाले.

Ukraine War: “…तर हे युद्ध लगेच थांबवू’; रशियानं ठेवल्या चार अटी, युक्रेनचं संविधान बदलण्याचीही मागणी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय वायदेबाजारात खनिज तेलाचा भाव ७ मार्च रोजी १३९ डॉलर (ब्रेंट क्रूड निर्देशांक) प्रतिबॅरलवर पोहोचला होता. दिवसअखेरीस तो १२५ डॉलरवर स्थिरावला. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसा भाव वाढलेले आहेत. त्यातच सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी रशियाच्या तेल निर्यातीवर सरसकट बंदीविषयी गंभीर विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर नोव्हाक यांनी दरवाढीचा इशारा दिला आहे.

विश्लेषण: खनिज तेल का भडकतेय? कधीपर्यंत ही स्थिती? परिणाम काय?

रशियन तेलावर निर्यातबंदी लादल्यास तेलाचे भाव ३०० डॉलर प्रतिबॅरलपर्यंतही जाऊ शकतील असा इशारा नुकताच दिलेला आहे. तेलाचे भाव आणखी वर किती जातील हे सांगता येत नाही. पण नजीकच्या काळात ते फारसे उतरणार नाहीत हे मात्र नक्की.

भारतावर काय परिणाम होणार?

भारताची तेलाची गरज भागवण्यासाठी जवळपास ८४ टक्के खनिज तेल आपण आयात करतो. देशांतर्गत पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या भावाशी निगडित असतात. यंदा जुलै २००८ नंतर प्रथमच ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १३९ डॉलर प्रतिबॅरल आणि १३० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले होते. तेलाचे भाव डिसेंबरपासून वाढत आहेत, पण उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे जवळपास चार महिने पेट्रोल-डिझेल दरवाढ रोखून धरण्यात आली होती. आता निवडणुका संपल्यामुळे ती कोणत्याही क्षणी होऊ शकेल, असा अंदाज आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीत या इंधनांवर विविध कर वा शुल्क कमी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंगत अशी जवळपास १५ ते १६ रुपये प्रतिलिटर दरवाढ होईल असा अंदाज आहे. तेल आयात करावे असतानाच, रुपयाही प्रतिडॉलर ७७ पर्यंत घसरला हे लक्षात घ्यावे लागेल. चार महिन्यापूर्वी भारतीय वाट्याच्या बास्केटमधील खनिज तेलाची किंमत प्रतिबॅरल ८१.५ डॉलर होती. ती १ मार्च रोजी १११ डॉलर प्रतिबॅरलवर होती. त्यामुळे इंधन दरवाढ अपरिहार्य दिसते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia warns western allies to price hike over ban oil imports hrc

ताज्या बातम्या