scorecardresearch

Premium

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमध्ये १० नागरिक ठार, हल्ल्याला मदत केल्याप्रकरणी एकाला अटक

रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील क्रामतोस्र्क येथे किमान १० जण ठार झाले तर अन्य ६१ जण जखमी झाले.

russia attack on ukraine
(रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमध्ये १० नागरिक ठार )

एपी, कीव्ह

रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील क्रामतोस्र्क येथे किमान १० जण ठार झाले तर अन्य ६१ जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. मंगळवारी संध्याकाळी क्रामतोस्र्क येथील वर्दळीच्या पिझ्झा रेस्टॉरंटवर हे क्षेपणास्त्र आदळले. हल्ल्यामध्ये नष्ट झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली शोधकार्य सुरू आहे. क्रामतोस्र्क शहरामध्ये युक्रेन सैन्याचे प्रादेशिक मुख्यालय आहे.

reason behind Hamas attack on Israel
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
iron-dome-israel
इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?
israel
इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये मृतांचा खच; १९८ जणांचा मृत्यू, १६०० जखमी
Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?

दरम्यान, या हल्ल्याला मदत केल्याच्या संशयावरून एका स्थानिक इसमाला अटक करण्यात आली. हा इसम स्थानिक वायू वाहतूक कंपनीचा कर्मचारी आहे. त्याने रशियासाठी या रेस्टॉरंटचे चित्रीकरण करून त्यांना त्याच्या लोकप्रियतेची माहिती दिली होती अशी माहिती सुरक्षा संस्थेने दिली. मात्र, या आरोपाच्या पुष्टय़र्थ त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही.

मृत मुलांमध्ये दोन १४ वर्षीय बहिणी आणि एका १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रशियाने मंगळवारी संध्याकाळी क्रामतोस्र्क येथे हवाई हल्ला केला. त्यामध्ये या लोकप्रिय पिझ्झा रेस्टॉरंटसह एक १८ मजली इमारत, ६५ घरे, पाच शाळा, दोन बालवाडय़ा, शॉपिंग सेंटर, प्रशासकीय इमारत आणि एक मनोरंजनाची साधने असलेली इमारत यांचे नुकसान झाले अशी माहिती प्रांतीय गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी दिली.

शहरामध्ये हल्ला झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली मृतदेह आणि जिवंत अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला जमिनीवरून हवेत हल्ला करणाऱ्या एस-३०० क्षेपणास्त्राने करण्यात आल्याचे आधी युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. नंतर मात्र इस्कंदर या लहान पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याचे युक्रेनच्या पोलिसांनी सांगितले.वॅग्नेरच्या अल्पजीवी बंडानंतरही रशियाने युक्रेनबाबत आपली भूमिका मवाळ केलेली नाही. त्याच वेळी या बंडाचा फायदा घेण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने काही हालचाली केल्याचेही दिसत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian missile attack kills 10 civilians in ukraine amy

First published on: 29-06-2023 at 03:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×