scorecardresearch

Premium

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक

Russia-Ukraine Conflict : व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर युद्धाला सुरुवात

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक

Russia Ukraine Conflict News: रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

दरम्यान अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. तर संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे. युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.

Joe Biden on Hamas attack on Israel
हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
s jayshanakr canada answer
हे भारताचे धोरण नाही!; कॅनडाच्या आरोपांना जयशंकर यांचे प्रथमच जाहीर उत्तर
canada prime minister justin trudeau (2)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंची भर संसदेत मोठी चूक; स्वत: अध्यक्षांना मागावी लागली माफी!
Donald Trump viral news
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! आता… महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल होताच फुटलं वादाला तोंड
Live Updates

Russia Ukraine War: पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपला मधे पडाल तर वाईट परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा इशाराच दिला आहे.

19:30 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्रीही उपस्थित

17:34 (IST) 24 Feb 2022
“बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घ्या”, युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाच्या सूचना

“गरज असल्याशिवाय घर सोडू नका, बाहेर जात असताना कागदपत्रे सोबत ठेवा, बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घ्या”, युक्रेनमधील भारतीयांना भारतीय दूतावासाच्या सूचना

https://twitter.com/IndiainUkraine/status/1496804668810346503

17:31 (IST) 24 Feb 2022
“हे मीम नाही, तर सध्याचं आमचं आणि तुमचं वास्तव आहे”

“हे मीम नाही, तर सध्याचं आमचं आणि तुमचं वास्तव आहे”, मीम ट्वीट करत युक्रेनचा रशियाला टोला.

https://twitter.com/Ukraine/status/1496767831182041089

16:00 (IST) 24 Feb 2022
“रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केलाय”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केल्याचं म्हटलं असून काही झालं तर आपलं स्वातंत्र्य हिरावू देणार नसल्याचं सांगितलं आहे. “रशियाने विश्वासघातकीपणे सकाळी हल्ला केला, ज्याप्रमाणे नाझी जर्मनीप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात केला होता. सध्याच्या घडीला आपले देश जागतिक इतिहासाच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. रशियाने दृष्ट मार्गाची निवड केली असताना युक्रेन आपलं रक्षण करत असून मॉस्कोला काही वाटत असलं तरी आपलं स्वातंत्र्य देणार नाही,” असं ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी नागरिकांना आपलं घरं आणि शहर वाचवण्यासाठी तयार राहा असं आवाहनही केलं आहे.

15:52 (IST) 24 Feb 2022
युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

युक्रेनने रशियासोबत सर्व राजनैतिक संबंध तोडले असल्याची घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विटरवरुन केली आहे. यावेळी त्यांनी रशियातील नागरिकांना युद्ध पुकारल्याविरोधात निषेध करण्याचंही आवाहन केलं आहे. “रशियातील ज्यांनी अद्याप आपला विवेक गमावला नाही त्यांनी बाहेर पडावं आणि युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाचा निषेध करावा,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

15:38 (IST) 24 Feb 2022
रशियाने ‘आक्रमण’ केल्याचा उल्लेख करण्यावर चीनचा आक्षेप

चीनने युक्रेनमधील परिस्थितीवर भाष्य करताना सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसंच रशियाच्या कृतीचे आक्रमण म्हणून विदेशी पत्रकाराकडून करण्याक आलेल्या उल्लेखावर आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी नियमित पत्रकार परिषदेत बोलताना हे भाष्या केलं.

15:23 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका, शेअर बाजारावर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत असून सेन्सेक्समध्ये २ हजार ६०० अकांची पडझड झाली आहे. तर निफ्टी ८०० अंकांनी कोसळला आहे.

15:13 (IST) 24 Feb 2022
युक्रेनच्या राजधानीत शहर सोडण्यासाठी वाहनांच्या रांगा

रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरु होताच युक्रेनमधील नागरिक राजधानी कीव सोडून बाहेर पडत असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

15:10 (IST) 24 Feb 2022
मॉस्को स्टॉक एक्स्चेंजमध्ये घसरण सुरुच

युद्ध पुकारल्यामुळे मॉस्को स्टॉक एक्स्जेंमधील घसरण सुरुच असून ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

14:55 (IST) 24 Feb 2022
रशियाचे ५० जवान ठार, अजून एक विमान पाडलं; युक्रेनचा दावा

युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत आपल्या ताब्यात आला असून रशियाच्या ५० जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच रशियाचं आणखी एक विमान पाडल्याचंही सांगितलं आहे. म्हणजे आतापर्यंत रशियाची सहा विमानं पाडण्यात युक्रेनला यश आलं आहे.

14:29 (IST) 24 Feb 2022
पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करावी, युक्रेनची भारताकडे विनंती

युक्रेनचे भारतातील राजदूत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहे. “भारताच रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करतो,” असं ते म्हणाले आहेत.

“पहाटे ५ वाजता हा निंदनीय हल्ला सुरु झाला आहे. अनेक युक्रेनियन एरोड्रोम, लष्करी विमानतळ, लष्करी विमानतळं, लष्करी व्यवस्थापनं यंच्यावर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत,” असं भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी सांगितलं आहे.

14:25 (IST) 24 Feb 2022
हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला

हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला आहे. तसेच रशियाचा हा दावा खोटा असल्याचं युक्रेनने म्हटलं.

14:23 (IST) 24 Feb 2022
युक्रेन बँकेकडून ग्राहकांवर नवे निर्बंध

युक्रेन बँकेकडून ग्राहकांवर नवे निर्बंध लादण्यात आले आहेत. युक्रेन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दिवसाला आता केवळ १ लाख हरिनिया (युक्रेनियन चलन) इतकेच पैसे काढता येतील.

13:28 (IST) 24 Feb 2022
युरोपियन कमिशन रशियावर लावणार नवे निर्बंध

युरोपियन कमिशनने रशियाविरोधात आणखी काही नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

13:23 (IST) 24 Feb 2022
मॉस्कोमध्ये शेअर बाजार घसरला

युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये शेअर बाजार २९ टक्क्यांनी घसरला आहे.

13:18 (IST) 24 Feb 2022
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या सात नागरिकांचा मृत्यू

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने केलेल्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले असल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

13:14 (IST) 24 Feb 2022
भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे – शशी थरुर

रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण सुरू केलं असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मॉस्कोच्या सुरक्षा चिंतेचे कितीही कौतुक केले जात असले तरी युद्धाचा अवलंब करणं किंवा समर्थन करणं अशक्य आहे. भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे असं म्हटलं आहे.

शशी थरुर यांनी रशिया दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करुन दिली आहे. १९७९ मध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनने व्हिएतनामवर हल्ला केल्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला होता अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे.

13:06 (IST) 24 Feb 2022
युक्रेनधील Ivano-Frankivsk मध्ये क्षेपणास्त्र हल्ला

रशियाने युक्रेनच्या Ivano-Frankivsk मध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला आहे

12:59 (IST) 24 Feb 2022
रशियाने युद्ध पुकारलं असतानाच इम्रान खान मॉस्को दौऱ्यावर; जगभरात चर्चा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. एकीकडे पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली असताना दुसरीकडे इम्रान खान यांचा दौरा असल्याने जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता तसंच युद्धाची घोषणा केल्यानंतर तिथे दौरा करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत. नवाज शरीफ यांनी १९९९ मध्ये केलेल्या दौऱ्यानंतर ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

12:51 (IST) 24 Feb 2022
“पुतीन यांनी हल्ला केलाय, पण आम्ही पळून जाणार नाही”

युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाने हल्ला केला असताना ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना आश्वासन दिलं आहे. “पुतीन यांनी हल्ला केला असला तरी कोणीही पळून जाणार नाही. लष्कर, राजकारणी प्रत्येकजण काम करत आहे. युक्रेन आपली रक्षा करणार,” असं ते म्हणाले आहेत.

12:38 (IST) 24 Feb 2022
युक्रेन लष्कराच्या कमांड सेंटर्सवर क्षेपणास्त्र हल्ला

कीव आणि खार्कीव येथील लष्कराच्या कमांड सेंटर्सवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं वृत्त Ukrainska Pravda या वेबसाईटने युक्रेनच्या नेत्याच्या हवाल्याने दिलं आहे.

12:36 (IST) 24 Feb 2022
नरकात तुमचं स्वागत आहे, युक्रेनच्या खासदाराचा रशियाला इशारा

युक्रेनचे खासदार Volodymyr Ariev यांनी इंडिया टुडेशी बोलताना रशियाने केलेल्या घुसखोरीला आपला देश योग्य उत्तर देईल असं म्हटलं आहे. नरकात तुमचं स्वागत आहे असंही ते रशियाला म्हणाले आहेत.

12:29 (IST) 24 Feb 2022
रशियाने दोन गावं घेतली ताब्यात

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने पूर्व युक्रेनमधील दोन गावं ताब्यात घेतली आहेत.

12:27 (IST) 24 Feb 2022
रशियाचा हवाई हल्ल्यातून अपार्टमेंट कॉम्प्लेक्सवर निशाणा

रशियाने Kharkiv येथील अपार्टमेंट कॉम्प्लेक्सवर हल्ला केला असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

12:25 (IST) 24 Feb 2022
रशियन क्रूझ क्षेपणास्त्र कीववर पडलं

रशियन क्रूझ क्षेपणास्त्र कीववर पडलं

12:24 (IST) 24 Feb 2022
भारतीय दुतावासाचं युक्रेनमधील नागरिकांना आवाहन

युक्रेनमधील भारतीय दुतावासाने देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. कीवच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना आपापल्या शहरांमध्ये परतण्यास सांगण्यात आलं आहे.

12:19 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमधील २५ शहरांवर रशियाने एकाच वेळी केली हल्ला; युक्रेनचा ‘तो’ दावाही फेटाळला

आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. तर रशियाने आम्ही केवळ लष्करी तळांवर हवाई हल्ले करत असल्याचा दावा केलाय.

सविस्तर बातमी वाचवण्यासाठी

12:18 (IST) 24 Feb 2022
रशियाने केलेल्या हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू

रशियाच्या हल्ल्यात शेकडो सेवा सदस्यांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्याने Wall Street Journal शी बोलताना सांगितलं आहे.

12:15 (IST) 24 Feb 2022
रशियाच्या क्षेपणास्त्रांचा युक्रेनच्या पायाभूत सुविधा, सीमा सुरक्षेवर हल्ला

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने क्षेपणास्त्रांचा वापर करत पायाभूत सुविधा, सीमा सुरक्षेवर हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी मार्शल लॉ लागू करण्यात आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. युक्रेनला नष्ट करण्याचा रशियाचा हेतू असल्याचा दावा त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

12:12 (IST) 24 Feb 2022
कीवमधील नागरिकांनी अंडग्राऊंड मेट्रो स्थानकांमध्ये घेतला आसरा

रशियाने बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली असल्याने आणि एअर रेड सायरन वाजल्याने युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. AFP च्या वृत्तानुसार, राजधानी कीवमधील अनेक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी अंडग्राऊंड मेट्रो स्थानकांमध्ये घेतला आसरा घेतला आहे.

11:49 (IST) 24 Feb 2022
रुपया ५५ पैशांनी घसरला

रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्याने रुपयालादेखील फटका बसला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरला असून ७५.१६ वर पोहोचला आहे.

11:45 (IST) 24 Feb 2022
बायडन यांची रशियाला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला जी ७ तसंच इतर सहकारी देशांकडून अनेक निर्बंध लावण्याची धमकी देण्यात आली आहे.

11:43 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले

युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले सुरु असल्याचा व्हिडीओ

11:36 (IST) 24 Feb 2022
युक्रेनने रशियाची लष्करी विमानं पाडली

युक्रेनने रशियाच्या एअर स्ट्राइकला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशियाची पाच लष्करी विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

11:05 (IST) 24 Feb 2022
“तुम्ही एकटे नाही,” संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनला देशांचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवं युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचं म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

11:02 (IST) 24 Feb 2022
युक्रेनध्ये एअर रेड सायरन वाजला

युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचं दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत.

10:59 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेन संघर्षातील जर्मन दुवा – काय आहे नॉर्ड स्ट्रीम-२ पाइपलाइन?

युक्रेनमधून थेट जर्मनीपर्यंत जाणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम – २ या वायूवाहिनी किंवा गॅस पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाल्याचा एक मतप्रवाह आहे. रशियातील नैसर्गिक वायू आणि इतर जीवाश्म इंधने अशा प्रकारे पाइपलाइनच्या माध्यमातून पश्चिम आणि दक्षिण युरोपभर पोहोचली, तर रशियाचे युरोपातील महत्त्व कितीतरी वाढेल अशी भीती वाटल्यामुळेच अमेरिकेने हा वाद उकरून काढल्याची टीका रशियावादी विश्लेषक करतात. नॉर्ड स्ट्रीम – २ पाइपलाइन त्यामुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे.

सविस्तर बातमी

10:56 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे खिशाला बसणार फटका; भारतात ‘या’ गोष्टी महागणार

रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगासह भारतातही पहायला मिळणार आहेत. या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतं. तर एलपीजी, केरोसीन अनुदान वाढू शकतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

10:50 (IST) 24 Feb 2022
युक्रेनकडून ‘मार्शल लॉ’ची घोषणा; नागरिकांना केलं आवाहन

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असं आवाहन केल्याचं वृत्त AP ने दिलं आहे. 'मार्शल लॉ' घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणलं जातं.

10:46 (IST) 24 Feb 2022
युक्रेनच्या राजधानीतील सध्याची स्थिती

युक्रेनची राजधानी कीवच्या एअरस्पेसची स्थिती

10:32 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमधून विशेष विमान दिल्लीत दाखल

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन येणारं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

10:28 (IST) 24 Feb 2022
संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत रशियाने पुकारलेल्या युद्धावर शिक्कामोर्तब

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांनी रशियाने युद्ध पुकारलं असल्याची माहिती दिली. “रशियन फेडरेशनच्या राजदुतांनी तीन मिनिटांपूर्वी राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशावर युद्ध पुकारल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे,” असं त्यांनी संयुक्त राष्ट्राने तातडीने बोलावलेल्या बैठकीत सांगितलं.

10:25 (IST) 24 Feb 2022
“युक्रेन आपलं रक्षणही करेल आणि विजयीदेखील होईल”

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपला देश पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धामध्ये आपलं रक्षण करेल आणि विजयीदेखील होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

10:17 (IST) 24 Feb 2022
युक्रेनने राजधानी कीवमधील विमानतळ केलं रिकामं

रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने राजधानी कीवमधील विमानतळं रिकाम केलं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरुन हलवलं जात आहे.

10:14 (IST) 24 Feb 2022
युक्रेन मार्शल कायदा लावण्याच्या तयारीत

युक्रेनमध्ये मार्शल कायदा लावला जाऊ शकतो. त्याप्रमाणे तयारी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली आहे.

09:58 (IST) 24 Feb 2022
संयुक्त राष्ट्राकडे युक्रेनची युद्ध थांबवण्यासाठी विनंती

युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाची घोषणा केली असताना हे युद्ध थांबवणं संयुक्ता राष्ट्राची जबाबदारी असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.

09:56 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज

रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी Kyiv आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर Mariupol येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तेथील नागरिकांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केले आहेत.

09:53 (IST) 24 Feb 2022
युक्रेनच्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी विशेष ऑपरेशन – रशिया

रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घोषणा केलेली विशेष कारवाई ही गेल्या कित्येत वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या युक्रेनच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. UN चार्टरच्या अनुच्छेद 51 च्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतला असून युक्रेनमधील परिस्थितीची पडताळणी करु असंही सांगितलं आहे.

09:48 (IST) 24 Feb 2022
भारताने सैन्य मागे घेण्यासाठी केलं आवाहन

भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.

09:45 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज

युक्रेनच्या राजधानीपासून ४८० किमी अंतरावर असणाऱ्या दुसरं सर्वात मोठं शहर Kharkiv मध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत. आज सकाळी युक्रेनच्या नागरिकांनी एक वेगळा देश पहायला मिळत असल्याचं CNN च्या रिपोर्टरने सांगितलं. युक्रेनमध्ये सध्या पहाटेचे ५ वाजून ५० मिनिटं झाली आहेत. भारतातील वेळ साडे तीन तासांनी पुढे आहे.

रशियाच्या लष्करी बळाचा वापर आपल्या देशाबाहेर करण्याचा अधिकार अध्यक्ष पुतिन यांना मिळाल्यानंतर आणि पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध लादून त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तणाव नाटय़मयरीत्या वाढला होता. यानंतर, युक्रेनने आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचे आवाहन केले होते. युरोपनेही बुधवारी आणखी संघर्षांची तयारी केली होती. गेले अनेक आठवडे शांतता असल्याचे दर्शवल्यानंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वाढती चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्याचा सल्ला दिला, तसेच तेथे कुणी असेल तर त्याने तत्काळ तेथून परतावे अशी शिफारस केली.

हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्न करत असून रशियाला सैन्य मागे घेत शांततेला एक संधी देण्याची विनंती केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Russian president vladimir putin announces military operation in ukraine sgy

First published on: 24-02-2022 at 08:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×