करोना महामारीने रशियामध्ये सध्या थैमान घातलेलं आहे. करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू असून, करोनाबाधितांचे मृत्यू देखील मोठ्याप्रमाणावर होत आहेत. या पार्श्वभूमवीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार बुधवारी मंत्रिमंडळाच्या विना कामकाजाचा आठवडा घोषित करण्याच्या आणि रशियन कामगारांना त्यांच्या कार्यालयांपासून दूर ठेवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. कराण, करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या विक्रमी वाढली आहे.

सरकारी टास्क फोर्सने बुधवारी, मागील २४ तासांमध्ये १ हजार २८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. ही संख्या महमारीच्या सुरूवातीपासूनची सर्वाधिक आहे. यामुळे रशियात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची संख्या २२६,३५३ झाली आहे. जी युरोपात आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

पुतिन यांनी म्हटले की, ते ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विना कामकाज कालावधी सुरू करण्याच्या प्रस्तावास पाठिंबा देत आहेत आणि पुढील आठवड्यापर्यंत तो विस्तारित करत आहेत. अगोदरच सात पैकी चार दिवस राज्याच्या सुट्ट्या आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की, काही ठिकाणी जिथे परिस्थिती सर्वाधिक धोकादायक आहे, तिथे काम न करण्याच कालावधी शनिवापासून सुरू होऊ शकतो.
काही भागात, वाढत्या संसर्गामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांना वैद्यकीय मदत स्थगित करावी लागली होती. कारण आरोग्य सेवा सुविधांना करोनाबाधित रूग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडण्यात आले होते.

रशियात मागील अनेक आठवड्यांपासून करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरू आहे आणि या आठवड्यात पहिल्यांदाच ही संख्या एक हजाराच्या वर पोहचली आहे.