scorecardresearch

जगभरातून निर्बंध आणि युक्रेन गुडघे टेकत नसतानाही मायदेशात मात्र पुतिन हिरो; युद्धाचा असा झाला फायदा

युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याचा पुतीन यांना मोठा फायदा, देशातील नागरिकांकडून समर्थन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे एकीकडे त्यांना जगभरातील अनेक देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत असताना देशात मात्र त्यांना फायदा झालेला दिसत आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले असताना देशातील जनता मात्र पुतीन यांच्या समर्थनार्थ आहे. Levada Centre ने केलेल्या सर्व्हेत ८० टक्क्यांहून जास्त रशियन नागरिकांनी पुतीन यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनमध्ये सैन पाठवल्यानंतर पहिल्यांदाच Levada कडून हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी ८३ टक्के नागरिकांनी आपण पुतीन यांच्या कृतीशी सहमत असल्याचं म्हटलं. हीच आकडेवारी फेब्रुवारी महिन्यात ७१ टक्के होती.

Levada नुसार, १५ टक्के नागरिकांनी आपण पुतीन यांच्या कृतीशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. आधी ही टक्केवारी २७ टक्के होती. तर २ टक्के नागरिकांनी तटस्थ भूमिका घेत काहीच मत नोंदवण्यास नकार दिला. यासोबत रशियन सरकारचं रेटिंगही वाढलं आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरु आहे. दरम्यान रशियात विरोध करणारे अनेक आवाज आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांना बंद करण्यास भाग पाडलं आहे किंवा ब्लॉक केलं आहे. रशियाने आपल्या सैन्यदलाबद्दल चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करणं गुम्हा ठरवलं असून ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बंदी आणली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian president vladimir putin popularity up since start of ukraine conflict sgy