कीव्ह : रशियाच्या एका सैनिकास युक्रेनच्या शस्त्रहीन नागरिकाला ठार केल्याप्रकरणी युक्रेनच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. रशियाने २४ फेब्रुवारीपासून युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर सुरू झालेल्या युद्धातील शिक्षा झालेला तो पहिला युद्धगुन्हेगार ठरला आहे. रशियाकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

वादिम शिशिमरिन या २१ वर्षीय रशियाच्या रणगाडा कमांडरला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. ईशान्य युक्रेनमधील चुपाखिव्का गावात २८ फेब्रुवारीला या युक्रेनच्या ज्येष्ठ नागरिकावर गोळीबाराचे आदेश वादिमने दिले असल्याचा त्याच्यावर आरोप होता.

Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
einstein brain history
आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

न्यायाधीश सेर्हिय आगाफोनोव्ह यांनी सांगितले, की वादिम शिशिमरिन याने आपल्या वरिष्ठांचे आदेश पाळत या नागरिकाच्या डोक्यात स्वयंचलित शस्त्राने बेधुंद गोळीबार केला. ही शिक्षा सुनावली जात असताना शिशिमरिन  निर्विकारपणे बसून होता. या खटल्याला युक्रेनमध्ये फार प्रतिकात्मक महत्त्व आहे. रशियाच्या आक्रमणानंतर रशियन युद्ध गुन्हेगारावर हा पहिला खटला पूर्ण झाला आहे. सुमारे दहा हजारांवर युद्धगुन्हे रशियाने केल्याचेही युक्रेनने नमूद केले आहे.