१२ वर्षानंतर सद्दाम हुसेनचा मृतदेह गायब

इराकचा माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन याचा मृतदेह रहस्यमयरित्या कबरीतून गायब झाला आहे

इराकचा माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन याचा मृतदेह रहस्यमयरित्या कबरीतून गायब झाला आहे. सद्दाम हुसेनला २००६ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यानंतर दफन करण्यासाठी त्याचा मृतदेह बगदादला पाठवण्यात आला होता. मात्र दफन करण्यात आल्याच्या १२ वर्षानंतर सद्दाम हुसेनचा मृतदेह कबरीतून गायब झाला आहे. काँक्रिट बांधकाम असलेली ही कबर सध्या मोकळी पडली असून, तिची नासधूस करण्यात आली आहे. सद्दाम यांची मुलगी त्याचा मृतदेह घेऊन गेला असल्याचं सांगितलं जात आहे.

वेगवेगळे दावे
सद्दामचे वंशज शेख मनफ अली अल – निदा यांनी दावा केला आहे की, सद्दाम अली यांची कबर खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर तो जाळण्यात आला. कबरीच्या सुरक्षेसाठी तैनात शिया पॅरामिलिट्री फोर्सचा दावा आहे की, दहशतवादी संघटना आयसीसने केलेल्या हवाई हल्ल्यात कबरीचं नुकसान झालं आहे.

दुसरीकडे सद्दामसोबत काम केलेल्या एका सैनिकाने केलेल्या दाव्यानुसार, सद्दाम हुसेनची मुलगी एका खासगी विमानाने इराकमध्ये आली होती आणि अत्यंत गुप्तता पाळत वडिलांचा मृतदेह घेऊन जॉर्डनला निघून गेली. इराकमधील एका प्रोफेसरने मात्र सद्दामची मुलगी पुन्हा कधीच इराकला परतली नसल्याचं म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्वत: ३० डिसेंबर २००६ रोजी सद्दाम हुसेनचा मृतदेह अमेरिकन लष्कर हेलिकॉप्टरने बगदादला रवाना केला होता. बगदादहून मृतदेह अल-अवजा येथे नेण्यात आला, जिथे त्याचं दफन करण्यात आला. सकाळ होण्याआधीच मृतदेह दफन करण्यात आला होता. दरवर्षी वाढदिवसाला लाखो समर्थक येथे जमा होत असतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saddam husseins dead body missing

ताज्या बातम्या