आध्यात्मिक नेते सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी गुरुवारी एका मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते मुलांच्या फायद्यासाठी फटाक्यांवरील बंदी मागे घेण्याचे आवाहन करताना दिसले.”जर तुम्ही प्राणीप्रेमी, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील माणूस असाल तर तुम्ही रोजच्या मांसाचं सेवन कमी केलं पाहिजे. आनंदाचा एक दिवस मुलांना मिळू द्या,”असं ट्विट सद्गुरूंनी केले.

त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “प्राणी आणि पक्ष्यांसाठी ही चिंतेची बाब आहे कारण आपल्या अन्नासाठी या ग्रहावरील २०० दशलक्षाहून अधिक प्राण्यांची दररोज आम्ही कत्तल करत आहोत. आपण जे मांस खात आहोत त्याच्या अर्धे मांस जर आपण खाल्ले तर आपण दररोज १०० दशलक्ष प्राणी वाचवू शकता. जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल तर तुम्ही तेच केले पाहिजे”.

“तुम्ही कत्तलखान्यात जाऊन समजून घ्या की तुम्ही जे कबाब खाल्ले होते ते काही काळापूर्वी प्राणी होते. बीफ रोस्ट हा एक अतिशय प्रेमळ प्राणी होता आणि तुम्ही खात असलेली कोंबडी एक पक्षी होती,” असे ते म्हणाले. तत्पूर्वी, त्यांनी ट्विट केले होते, “मानवी क्रियाकलापांच्या हानिकारक परिणामांवर उपाय शोधल्याशिवाय आणि अंमलात आणल्याशिवाय आपण मानवी कल्याणाबद्दल बोलू शकत नाही. केवळ मानवी चेतना वाढवून आपण आपल्या ग्रहाच्या पर्यावरणीय स्थितीचे पुनरुज्जीवन करण्याचे व्रत करू शकतो.”

सद्गुरुंनी “ज्यांना प्रदूषणाची काळजी आहे” त्यांच्यासाठी पर्यायी उपाय सांगितला. “वायू प्रदूषणाची चिंता करत मुलांना फटाक्यांचा आनंद घेण्यापासून रोखण्याचे कारण नाही. त्यांच्यासाठी तुमचा त्याग म्हणून, तुमच्या कार्यालयात ३ दिवस चालत जा. त्यांना फटाके फोडण्याची मजा लुटू द्या.”