“राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित आहे, जगात बंधूभाव टिकून आहे; संघाला समजून घेण्यासाठी…”

“आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस घराघरात, जनमाणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत”, अशी टीकाही केलीय.

Rashtriya Swayamsevak Sangh
आरएसएसचं कौतुक करताना भाजपाच्या महिला खासदाराने काँग्रेसवरही साधला निशाणा (प्रातिनिधिक फोटो)

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जगामध्ये बंधुत्वभाव टिकून राहण्यासाठी आरएसएसच जबाबदार असल्याचा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलाय. तसेच उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच शांती मिळाली आहे असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

छत्तीसगडमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. हे धर्मांतर रोखण्याचं काम संघ करत असल्याचंही त्या म्हणाल्या. “विश्वामधील बंधुत्वाची भावना जिवंत असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आहे. देश आरएसएसमुळे सुरक्षित आहे. कुठेही कोणत्याप्रकार उपद्रवी लोकांपासून आपल्याला शांती मिळते ती आरएसएसमुळे आहे,” असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.

ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जातोय
पुढे बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी, “छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या राज्यात, प्रदेशामध्ये वाकून पहावं. येथे एवढ्या मोठ्याप्रमाणात धर्मांतर होत आहे की हिंदूंचं धर्मांतर करुन त्यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जातोय. याचे पुरावे आहेत. जनता त्रस्त आहे. येथे एवढा भ्रष्टाचार आहे एवढा अन्याय होतोय तरी ते शांत बसले. त्यांनी जरा या गोष्टींकडे पहावं,” असा सल्ला दिलाय.

काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील…
“आरएसएस समजून घेण्यासाठी त्यांना काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील. तरीही त्यांना आरएसएस समजून घेता येणार नाही कारण त्यांच्याकडे ते समजून घेण्याचा भावच नाहीय,” अशी टीका प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलीय.

…म्हणून ते आरएसएसला त्रासलेत
तसेच पुढे बोलताना, “आरएसएसमुळे काँग्रेसला पूर्ण मतांतर करता येत नाहीय, त्यांना दहशतवाद पसरवता येत नाहीय. आरएसएस यावर अंकूश लावत असेल तर ते सत्ता गाजवताय असं नाहीय. आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस ही संघटना घराघरात, जन माणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत,” असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात.

आधी आपल्या घरात पाहा मग…
त्याचप्रमाणे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी, “टीका करणाऱ्यांचा आरएसएसला काही फरक पडत नाही असं मला वाटतं. आधी आपल्या घरात पाहा मग बाहेर बघा,” असा खोचक सल्लाही विरोधकांना दिलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sadhvi pragya thakur says country is safe because of rss scsg

फोटो गॅलरी